शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांचे हाल जुन्या आग्रारोडवर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:45 IST

मालेगाव शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून, संबंधितांनी रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

मालेगाव कॅम्प : मालेगाव शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून, संबंधितांनी रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांचे हाल होत असून, रस्त्यावर लहान-मोठे खड्डे असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जुन्या आग्रारोडवर काही ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शहरातील पश्चिम भागातील जुना आग्रारोड, सटाणारोड, कॅम्प रस्ता येथे अनेक ठिकाणी रस्ते उखडून खडी बाहेर आली आहे. जुन्या आग्रारोडवरील छाजेड ट्रान्सपोर्टसमोर लगत असलेल्या रस्त्यांवरील पूर्णपणे खडी उखडून दगड बाहेर आले आहे.रस्त्यावर मोठ्या आकाराचा पसरट खड्डा पडला आहे. या ठिकाणी रस्त्यावर जमिनीखालून गेलेल्या नळ जोडण्यांना अनेक दिवसांपासून गळती लागली आहे तर ऐन पाणी येण्याच्या वेळेत वाहिनीतून दाब वाढल्यावर पाइपामधून पाणी सरळ रस्त्यावर खड्ड्यात साचत आहे. ही गळती अनेक महिन्यांपासून होत आहे परंतु जुजबी दुरुस्ती व वेळकाढूपणा मनपाकडून केला जात आहे. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होते व वेळोवेळी खर्च वाया जात आहे. या रस्त्यावर मोसमपुलापासून गिरणा पुलापर्यंत असेच लहान-मोठे खड्डे झाले असल्याने वाहनचालकांना डोकेदुखी ठरत आहे. सटाणारोडवरदेखील अनेक ठिकाणी खड्डे झाले आहे. येथून स्टेट बॅँककडे जाणारा वळण रस्ता, साठफुटी वळण रस्ता, जाजू हॉस्पिटल समोरील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे झाले आहे. येथे रस्ता खोदून खासगी नळ जोडण्यांमुळे रस्त्यांवर आडव्या चाºया खोदलेल्या आहे. त्या व्यवस्थित बुजविण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे या रस्त्यावर अनेकदा लहान-मोठे अपघात होतात व वाहनांचे नुकसान व वादाचे प्रसंग निर्माण होतात. येथेही जुजबी दुरुस्ती व खर्च होत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण झाले असले तरी रस्ता अजिबातच सुस्थितीत नसल्याने पादचारी, लहान मोठ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.