शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव आगाराचे ७८ दिवसांत ३ कोटी ९० लाखांचे उत्पन्न बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 00:11 IST

मालेगाव (अतुल शेवाळे) : राज्य परिवहन महामंडळाचे विलीनीकरण करून कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्यावा, यासाठी पुकारण्यात आलेल्या संपाचा तिढा अद्यापही सुटत नसल्याने सर्वसामान्य प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. मालेगाव आगारात गेल्या ७८ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे आगाराचे ३ कोटी ९० लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

ठळक मुद्देदहा कर्मचारी हजर : पाच फेऱ्या सुरू; ३ लाख ८५ हजारांचे उत्पन्न

मालेगाव (अतुल शेवाळे) : राज्य परिवहन महामंडळाचे विलीनीकरण करून कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्यावा, यासाठी पुकारण्यात आलेल्या संपाचा तिढा अद्यापही सुटत नसल्याने सर्वसामान्य प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. मालेगाव आगारात गेल्या ७८ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे आगाराचे ३ कोटी ९० लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

तर गेल्या ४ जानेवारीपासून प्रत्येकी पाच वाहक व चालक कामावर हजर झाल्याने नाशिक मालेगाव अशा १०७ फेऱ्या मारून ३ लाख ८५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आगारातील कर्मचाऱ्यांनी गेल्या ७ नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मध्यस्थीनंतर संप पुकारणाऱ्या २२ संघटनांनी संपातून माघार घेतली आहे; मात्र कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत. मालेगाव आगारात ४०५ कर्मचारी असून अद्यापही ३५९ कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी झाले आहेत. तर ५ चालक व ५ वाहक, कार्यशाळेचे ९ व प्रशासकीय विभागातील २८ असे ४५ कर्मचारी हजर झाले आहेत. १० जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, तर ११८ जणांना कामावर हजर का राहू नये, अशी तंबी देण्यात आली आहे. मालेगाव आगारातून गेल्या ४ जानेवारीपासून १० कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. साडेअकरा हजार किलोमीटरच्या १०७ फेऱ्या मारून आगाराने ३ लाख ८५ हजारांचे उत्पन्न मिळविले आहे. तर गेल्या ७८ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे प्रत्येकी ५ लाख रुपये प्रतिदिन असे ७८ दिवसांचे ३ कोटी ९० लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. या संपाचा तिढा सुटत नसल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहे.नाशिकसाठी दररोज पाच फेऱ्यागेल्या ४ जानेवारीपासून प्रत्येकी ५ चालक व वाहक हजर झाल्याने दररोज नाशिक- मालेगाव अशा पाच फेऱ्या होत आहेत. एका दिवसात शंभर ते दीडशे प्रवासी प्रवास करीत आहेत. यातून आगाराला ३ लाख ८५ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.मालेगाव आगाराची स्थितीएकूण बसेस - ७५सुरू बसेस - ५संपात सहभागी कर्मचारी - ३५९कामावर हजर कर्मचारी - ४५प्रति दिन होणारे नुकसान - ५ लाखदैनंदिन प्रवासी - सुमारे ३००

 

 

 

टॅग्स :MalegaonमालेगांवBus Driverबसचालक