शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडूनही मालेगाव हगणदारीमुक्त घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:43 IST

मालेगाव : राज्य शासनाने शहर हगणदरीमुक्त घोषित केल्यानंतर केंद्र शासनाच्या कमिटीनेही पाहणी करुन शहर हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित करुन तसे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली.

ठळक मुद्देसंगीता धायगुडे : राज्य शासनानंतर केंद्र सरकारकडूनही शिक्कामोर्तबप्रशासनाने जनजागृती करण्यासाठी पथनाट्य घेतले

मालेगाव : राज्य शासनाने शहर हगणदरीमुक्त घोषित केल्यानंतर केंद्र शासनाच्या कमिटीनेही पाहणी करुन शहर हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित करुन तसे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली.पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. सहाय्यक आयुक्त राजू खैरनार, उपायुक्त कमरूद्दीन शेख उपस्थित होते. धायगुडे म्हणाल्या की, शहर हागणदरीमुक्त व्हावे यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. शहरात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची निर्मिती व नादुरुस्त शौचालयांची दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. प्रशासनाने जनजागृती करण्यासाठी पथनाट्य घेतले. नागरिकांनी खुल्यावर शौचास बसू नये म्हणून आवाहनही करण्यात आले होते. उघड्यावर शौचास बसणाºया ८१ जणांवर गुन्हे दाखल केले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. शहर हगणदरीमुक्त करणे हे मोठे आव्व्हान होते. मात्र प्रशासनाने घेतलेली मेहनत व नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळेच शहर हागणदरीमुक्त करण्यात यश आले आहे. यासाठी महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, पालिका अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन, होमगार्ड, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय, बचत गट यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे त्यांनी आभार मानले. प्रशासनास नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. महापौर रशीद शेख तसेच प्रशासनाच्या वतीने आयुक्त धायगुडे यांचा सत्कार करण्यात आला.कायमस्वरूपी तरतूदहगणदरीमुक्त करण्यात आलेली ठिकाणे कायमस्वरूपी हगणदारी मुक्त राहावीत यासाठी या ठिकाणी अमृत योजनेतून क्रीडांगण, उद्याने अशा उपाययोजना भविष्यात करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाकडून शहर हगणदरीमुक्त घोषित झाले असले तरी दर सहा महिन्यांनी त्याचे पुनर्सर्वेक्षण करण्यात येणार आहे.राज्यस्तरीय समितीची पाहणी राज्यस्तरीय समितीच्या पाहणी दौºयानंतर केंद्रास राज्य शासन अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर केंद्राची समिती पाहणीसाठी आली होती. त्यानंतर शहर हगणदरीमुक्त घोषित करण्यात आले आहे.