अब्दूल रहीम शेख गुलाब (६०) रा. सर्वे नं. ६२/५/२ प्लॉट नं. ५ या यंत्रमाग कारखानदाराने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गेल्या सोमवारी (दि.२२) रात्री सात वाजताच्या सुमारास ही चोरी झाली. फिर्यादी बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्याने बंद घराच्या मागील बाजूचे किचन रुमचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूमचे आतील लाकडी कपाटाचे कुलूप तोडून त्यात ठेवलेले व दुसऱ्या खोलीत आतील लाकडी कपाटाचे कुलूप ताेडून त्यात ठेवलेले ७ लाख १३ हजार ९०० रुपये आणि १ लाख ७४ हजार ९४० रुपये किमतीचे १२ तोळे ९०० ग्रॅम ६६ मिली वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ८ लाख ८८ हजार ८४० रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालेगावी धाडसी घरफोडी; ९ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:16 IST