शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी काँग्रेसचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST

गेल्या आठवड्यात सामान्य रुग्णालयाच्या कार्य पध्दतीत सुधारणा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांनी रुग्णालयाला भेट ...

गेल्या आठवड्यात सामान्य रुग्णालयाच्या कार्य पध्दतीत सुधारणा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांनी रुग्णालयाला भेट दिली होती व रुग्णालय प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला. मात्र यावेळी त्यांच्या समवेत कॉग्रेसचे सभागृह नेते असलम अन्सारी हेही सोबत होते. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

माजी आमदार शेख काँग्रेस पक्षात असतांना मनपाचे विद्यमान सभागृह नेते अन्सारी मोहंमद असलम व माजी नगरसेवक शकील अहमद जानी बेग हे दोघे खंदे समर्थक मानले जात. आसिफ शेख यांना गत विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतरही पक्षश्रेष्ठींकडुन शेख यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यामुळे व्यतीत होत शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. त्यांच्यासोबत मनपाच्या निवडणुकीत पराभूत नगरसेवकांपैकी अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे जवळपास दीड वर्षापासून रेंगाळलेला अध्यक्षपदाचा तिढाही सुटला आहे.

सामान्य रुग्णालय डॉक्टरांकडून प्रसूतीसाठी दाखल महिलांना उच्च रक्तदाब व विविध कारणास्तव धुळे येथे पाठविण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने आसिफ शेख यांनी शिष्टमंडळासह डॉ. हितेश महाले यांची भेट घेऊन चर्चा करीत यात सुधारणा करण्यासाठी आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला. मात्र यावेळी शिष्टमंडळात माजी नगरसेवक शकील बेग, रफीक शेख व कार्यकर्त्यांसह कॉंग्रेसचे सभागृह नेते अन्सारी मोहंमद असलम हे उपस्थित होते. परिणामी मालेगाव मध्यच्या राजकारणात याची उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे.

चौकट अन्सारींनीही वाचला पाढा

काँग्रेसचे मनपा विद्यमान सभागृह नेते तथा अन्सारी मोहंमद असलम व माजी नगरसेवक शकील बेग हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मालेगाव जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांचे खंदे समर्थकच नसून यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे मैत्रीपुढे पक्षाला काही काळ बाजूला सावरत शेख यांच्यासह अन्सारींनीही डॉ. हितेश महाले यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही.