शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खैरनार बंधूंवर प्राणघातक हल्ला मालेगाव : राज्यमंत्री दादा भुसे यांच्या पुत्रासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:53 IST

येथील भाजपाचे पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीे संचालक व अद्वय हिरे यांचे समर्थक गणेश खैरनार व त्यांचे लहान बंधू प्रसाद खैरनार यांची वाहने सिनेस्टाईल अडवून त्यांची तोडफोड करीत खैरनार बंधू व त्यांच्या दोघा मित्रांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे, राहूल गायकवाड, विकी चव्हाण या तिघांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी ताब्यात घेतले रस्त्यावर रात्रीच ठिय्या आंदोलन

मालेगाव : येथील भाजपाचे पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीे संचालक व अद्वय हिरे यांचे समर्थक गणेश खैरनार व त्यांचे लहान बंधू प्रसाद खैरनार यांची वाहने सिनेस्टाईल अडवून त्यांची तोडफोड करीत खैरनार बंधू व त्यांच्या दोघा मित्रांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे, राहूल गायकवाड, विकी चव्हाण या तिघांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सोमवारी रात्री कॅम्प रस्त्यावरील वनविभागाच्या कार्यालयाजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी प्रसाद खैरनार यांनी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खैरनार व त्याचे मित्र रोहित भामरे, अक्षय राणा हे खरेदी करुन अद्वय हिरे यांच्या मालकीच्या क्र. एमएच १२ एफएफ ७८६ या कारने कॅम्परोडने जात असताना वनविभागाच्या कार्यालयाजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या अविष्कार भुसे, राहूल गायकवाड, विकी चव्हाण यांनी कार अडवून लाकडी दांडा व बॅटच्या साहाय्याने गाडीच्या काचा फोडल्या तसेच प्रसाद व त्याच्या मित्रांना मारहाण केली. तसेच पं. स. सदस्य गणेश खैरनार यांच्या एमएच ४१ व्ही ७७९१ या कारच्या काचा फोडून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिवसेना व भाजपा, हिरे समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मारहाणीत जखमी झालेल्या पं. स. सदस्य खैरनार यांच्यावर धुळे येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती अद्वय हिरे यांना मिळताच त्यांनी समर्थकांसह घटनास्थळी धाव घेतली. मारहाण करणाºयांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी कॅम्प रस्त्यावर रात्रीच ठिय्या आंदोलन केले. पोलीस उपअधिक्षक अजित हगवणे, छावणीचे पोलीस निरीक्षक इंद्रजीत विश्वकर्मा यांनी आंदोलकांची समजूत काढली. त्यानंतर हिरे यांनी छावणी पोलीस ठाण्यात समर्थकांसह धाव घेतली. रात्री उशिरा तिघा संशयितांविरुद्ध प्राणघातक हल्ला व तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एल. पाटील करीत आहेत.भाजपातर्फे मूक मोर्चाखैरनार बंधूंवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ व संशयित आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर भाजपा पदाधिकारी व हिरे समर्थकांनी मूक मोर्चा काढला होता.