शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव बॉम्बस्फोट तपासी अधिकारी ते सीबीआय संचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:12 IST

नाशिक : राज्याचे पोलीस महासंचालक असलेले १९८५ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी सुबोध कुमार जयसवाल यांचा पोलीस सेवेत नाशिक सोबत ...

नाशिक : राज्याचे पोलीस महासंचालक असलेले १९८५ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी सुबोध कुमार जयसवाल यांचा पोलीस सेवेत नाशिक सोबत जवळचा संबंध आला. तेलगी मुद्रांक घोटाळ्याचा तपास असो किंवा मालेगाव बॉम्बस्फोटाचा. या दोन्ही महत्वाच्या व राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या गुन्ह्यांचा जयसवाल यांनी कसोशीने तपास करत अनेक मासे गळाला लावले होते. त्यांच्या धडाकेबाज कारवाईने भल्याभल्यांना धडकी भरविली होती. त्यांच्याकडे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.

राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख असताना जयसवाल यांनी नाशिकच्या मालेगाव मधील बॉम्बस्फोटाचा तपास केला होता.

तसेच मुंबईतील २००६ रेल्वे बॉम्बस्फोटाचा तपास त्यांच्याच नेतृत्वात सुरू करण्यात आला होता. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील नाशिक सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये पोलीस सेवा बजावल्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे.

बहुचर्चित कोट्यावधी रुपयांचा तेलगी स्टँप पेपर घोटाळ्याच्या तपासी पथकाचे ही ते प्रमुख राहिले आहेत. त्यावेळी त्यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईने जयसवाल चर्चेत राहिले होते. यावेळी त्यांनी पोलीस दलातील अनेक बड्या अधिकारीही आपल्या चौकशीच्या ‘रडार’वर घेतले होते. तसेच अनेक पोलिसांना अटकही केली होती.

२००८ साली केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेल्या सुबोध कुमार यांना २०१८ साली पुन्हा एकदा महाराष्ट्रात बोलवण्यात आले. तेव्हा ते भारतीय गुप्तचर संस्थेच्या ( रॉ) अतिरिक्त सचिव पदावर कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. २०१९ साली त्यांना पदोन्नती देऊन महाराष्ट्र पोलीस दलाचे महासंचालक पद सोपविण्यात आले होते. त्यानंतर आता थेट सीबीआय संचालकपदाची धुरा त्यांना देण्यात आली आहे. सीबीआयच्या संचालकपदाची सूत्रे हाती घेणारे जयसवाल हे महाराष्ट्र कॅडरचे दुसरे अधिकारी ठरले आहेत.