शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव : दोघांनी तक्रारी मागे घेतल्याने वादावर पडदा मारहाण प्रकरणामुळे भाजपा कार्यकर्ते सैरभैर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:03 IST

नोटाबंदी निर्णयाच्या स्वागत कार्यक्रम आयोजनाच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेशावरून भाजपाचे युवा नेते अद्वय हिरे व महानगरप्रमुख सुनील गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये झालेली शाब्दिक बाचाबाची, हाणामारी व शिवीगाळ या अंतर्गत वादामुळे भाजपातील कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.

ठळक मुद्देसामान्य कार्यकर्ते मात्र या प्रकाराने अस्वस्थव्हॉट्सअ‍ॅपवर शाब्दिक चकमकगाडीवर दगडफेक व मारहाण केल्याचा आरोप राजकीय वातावरण ढवळून निघाले

मालेगाव : नोटाबंदी निर्णयाच्या स्वागत कार्यक्रम आयोजनाच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेशावरून भाजपाचे युवा नेते अद्वय हिरे व महानगरप्रमुख सुनील गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये झालेली शाब्दिक बाचाबाची, हाणामारी व शिवीगाळ या अंतर्गत वादामुळे भाजपातील कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी मागे घेतल्याने वादावर पडदा पडला असला, तरी सामान्य कार्यकर्ते मात्र या प्रकाराने अस्वस्थ झाले आहेत.नोटाबंदीच्या निर्णयाला वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने भाजपाचे महानगरप्रमुख सुनील गायकवाड यांनी स्वागत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा संदेश त्यांच्या समर्थकांनी भाजपाच्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला होता. या ग्रुपवर अद्वय हिरे यांनीही संदेश टाकला होता. यावरून दोघा गटांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर शाब्दिक चकमक उडाली. हिरे यांनी गायकवाड समर्थकांना बंगल्यावर येण्याचे आव्हान दिले होते. त्यास प्रत्युत्तर म्हणून गायकवाड समर्थकांनीच सटाणा नाक्यावर येण्याचे आव्हान दिले. यानंतर हिरे हे त्यांच्या काही समर्थकांना घेऊन गायकवाड यांच्या निवासस्थानाकडे आले असता गायकवाड यांच्या समर्थकांनी गाडीवर दगडफेक व मारहाण केल्याचा आरोप हिरे यांनी केला आहे. हिरे यांनी सटाणानाका भागात येऊन शिवीगाळ व असभ्य वर्तन केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला.या मारहाणीत हिरे जखमी झाले होते. त्यांनी सामान्य रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. यानंतर हिरे छावणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले असता पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते. पोलीस अधीक्षकांचा भ्रमणध्वनीही बंद येत होता. त्यामुळे हिरे यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाºयांनी दोन्ही गटांच्या तक्रारींची नोंद घेतली. बुधवारी दिवसभर राजकीय पदाधिकाºयांनी व आपापसातील सामंजस्यामुळे पोलीस ठाण्यातील दाखल तक्रारी मागे घेण्यात आल्या. दरम्यान, या प्रकारामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.