शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी सलीम शेख यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:20 IST

साधारण मनुष्यही प्रसंगी असाधारण कर्तृत्व करू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणून सलीम शेख आहे. त्यांचे धाडस सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी येथे केले.

संगमेश्वर : साधारण मनुष्यही प्रसंगी असाधारण कर्तृत्व करू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणून सलीम शेख आहे. त्यांचे धाडस सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी येथे केले.अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यातून स्वत: जखमी असताना प्रसंगावधान राखून बसमधील भाविकांचे प्राण वाचविणाºया सलीम शेख या बसचालकाचा येथील सम्राट मंडळ व हम हिंदुस्थानी एकता संघटनेने नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पोद्दार यांनी आतंकवाद्यांपुढे कुठलाही भारतीय नागरिक झुकणार नाही व सलीम शेख यांनी कर्तव्यप्रति निष्ठा व्यक्त केल्याने राष्टÑीय एकतेचा चांगला संदेश दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.प्रारंभी सम्राट मंडळाचे प्रमुख सुभाष परदेशी यांनी मंडळाच्या २५ वर्षाच्या कार्याचा आढावा सादर केला. पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते खलील देशमुख यांनी इतिहास चुकीच्या पद्धतीने शिकविला जात आहे, असे सांगून मालेगाव-करांच्या हिंदू-मुस्लीम एकतेला सलाम केला. पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी मालेगावकरांच्या एकतेचे कौतुक केले. सलीम शेख यांनी साहसी काम करून हिंमत दाखविली व मिळालेल्या संधीचे सोने केले असल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी उपमहापौर सखाराम घोडके, नगरसेवक राजाराम जाधव, पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, अशोक परदेशी, राजेंद्र भोसले, राजेश गंगावणे, रहीम शेख, सुनील वडगे, उमेश अस्मर, यादव साळुंके, मौलाना सिराज कासमी, मामकोचे व्हा. चेअरमन विठ्ठल बागुल, शंकर बागुल, प्रकाश वडगे उपस्थित होते.