शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

मालेगावी शहर काँग्रेसचा इंधन दरवाढीच्या निषेधार्थ  मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:44 IST

देशात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महापौर रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली दुपारी ३ वाजता अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यापैकी मोर्चेकऱ्यांच्या वतीने प्रांताधिकारी अजय मोरे यांनी निवेदन स्वीकारले.

आझादनगर : देशात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महापौर रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली दुपारी ३ वाजता अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यापैकी मोर्चेकऱ्यांच्या वतीने प्रांताधिकारी अजय मोरे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी आमदार आसीफ शेख, माजी महापौर सभागृहनेता ताहेरा शेख आदी उपस्थित होते. पेट्रोल-डिझलच्या किमतीमध्ये  दैनंदिन होणारी भाववाढ, घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे नियोजन कोलमडले असून, याचा परिणाम होऊन सर्वसामान्य जनता महागाईने होरपळून निघत आहे. राष्टÑीय काँग्रेसच्या आदेशान्वये आज काँग्रेस कमिटी कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या अग्रभागी महापौर रशीद शेख बैलगाडीवर विराजमान झाल्याने आकर्षण ठरले. घोडे, तांगा, ठेलागाडीवर दुचाकी बांधून कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी विविध प्रकारच्या घोषणा देऊन मोदी सरकारवर टीका करण्यात आली.मोर्चा आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळा, मोसमपूलमार्गे अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलिसांनी अडविला. यावेळी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. पक्ष प्रवक्ता साबीर गोहर, हाफीज अनिस अजहर, आमदार आसीफ शेख, महापौर रशीद शेख यांची भाषणे झाली.यावेळी नगरसेवक हाजी निहाल अन्सारी, ईस्माईल कुरैशी, जमील क्रांती, माजी नगरसेवक रफीक शेख खजूरवाला, अ‍ॅड. हिदायतउल्ला, तुराबअली साहेबअली, धर्मा भामरे, नगरसेवक नंदकुमार सावंत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी माजी महापौर ताहेरा शेख, नगरसेविका जैबुन्नीसा रिजवान व महिलांनी रस्त्यावरच चुलींवर भाकरी भाजून मोदी सरकारचा निषेध केला.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदMalegaonमालेगांव