शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलावरुन पिंपळगावमध्ये प्रवेशासाठी पर्यायी मार्ग करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 00:49 IST

पिंपळगाव बसवंत : उड्डाण पुलावरून पिंपळगावमध्ये प्रवेश करण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याच्या सूचना आमदार दिलीप बनकर यांनी महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना दिल्या.

ठळक मुद्देदिलीप बनकर यांच्या महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना सूचना

गेल्या अनेक दिवसांपासून पिंपळगाव बसवंत ते गोंदे महामार्गाचे काम सुरू आहे. त्यात पिंपळगाव बसवंत येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील बाजार समिती ते पाचोरे वणी फाटापर्यंत उड्डाणपूल करण्यात आला आहे. हा उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास आल्याने पिंपळगाव बसवंत शहराजवळील उड्डाणपूल वाहतुकीसाठी ८ जानेवारीपासून दोन्ही बाजूने खुला करण्यात आला आहे. परंतु उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील बाजार समिती ते पाचोरे वणी फाटा या ६ किलोमीटर अंतरामध्ये पिंपळगाव बसवंत शहरात जाण्यासाठी कुठलाही पर्यायी मार्ग काढण्यात आलेला नाही. पर्यायी मार्ग सर्व्हिस रोडवर वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. ही बाब लक्षात घेत आमदार बनकर यांनी संबंधित नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष ठिकाणची पाहणी करीत प्रमिला लॉन्सजवळ उड्डाणपुलावरून पूर्व-पश्चिम बाजूने चढ उतरण्याकरीता पर्यायी मार्ग त्याचप्रमाणे शगुन लॉन्सजवळ पर्यायी मार्ग तसेच रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ बेहेड, नारायणटेंभी, कारसुळ आदी गावांना जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात यावा. पाराशरी नदीवर सर्व्हिस रोडसाठी नवीन पूल तयार करावा, चिंचखेड चौफुलीवर उड्डाणपुलाखाली गार्डन व व्यावसायिकांसाठी शौचालय निर्मिती करावी, सर्व्हिस रोडलगतच्या गटारीचे काम त्वरित पूर्ण करावे, सर्व्हिस रोड लगतचे स्ट्रीटलाईट बसविणे, सर्व्हिस रोड लगतची साफसफाई करणे, वणी चौफुली येथील सर्कल दुरुस्ती करून निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्या असे विविध प्रश्न लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी बनकर यांनी सबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.याप्रसंगी महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंके, पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुहास मोरे, पिंपळगाव बसवंत राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष बाळा बनकर आदीसह नॅशनल हायवे ॲथोरिटीचे अधिकारी दिलीप पाटील, पंकज मोहाबे, मुरली मोहन, सुरेश शिंदे, फैजान खान, विनोद बच्छाव, निखील गाडे, प्रवीण जावरे उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकroad transportरस्ते वाहतूक