शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांना पोषण आहारासाठी पर्यायी व्यवस्था करा : सीईओंचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 19:44 IST

नाशिक : राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला असल्याने त्याचा थेट परिणाम पोषण आहारावर होण्याची शक्यता गृहित धरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी गटविकास अधिकारी व एकात्मिक बालविकास अधिकारी यांना तातडीने आदेश देऊन पर्यायी व्यवस्था करून बालकांना अंगणवाडीत पोषण आहार उपलब्ध करून देण्याबाबत कळविले आहे.१३ सप्टेंबरलाच यासंदर्भात मुख्य ...

नाशिक : राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला असल्याने त्याचा थेट परिणाम पोषण आहारावर होण्याची शक्यता गृहित धरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी गटविकास अधिकारी व एकात्मिक बालविकास अधिकारी यांना तातडीने आदेश देऊन पर्यायी व्यवस्था करून बालकांना अंगणवाडीत पोषण आहार उपलब्ध करून देण्याबाबत कळविले आहे.१३ सप्टेंबरलाच यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी हे पत्र गटविकास अधिकारी व एकात्मिक बालविकास अधिकारी यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचारी (अंगणवाडी सेविका/ मदतनीस) यांनी ११ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संप पुकारला असून, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या राज्यातील अंमलबजावणी संदर्भात अंगणवाडीतील लाभार्थ्यांना पोषण आहाराचा पुरवठा अखंडपणे होणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने संपामुळे कुपोषित बालके व अंगणवाडीतील पोषण आहाराचे लाभार्थी बाधित होऊ नये पोषण आहार पुरवठ्यात खंड पडू नये यासाठी आहार वाटपाच्या कामात स्थानिक पातळीवरील शासकीय यंत्रणेतील कर्मचारी जसे आशा कर्मचारी, आरोग्य सहायक, ग्रामसेवक, तलाठी, प्राथमिक शाळा शिक्षक, ग्रामशिक्षण समितीच्या सहाय्याने तसेच स्थानिक गरम-ताजा आहार पुुरविणाºया महिला बचतगट आदींच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था म्हणून आहार वाटपाचे काम करून घेण्याबाबत नियोजन करावे, असे म्हटले आहे.