नाशिक : महावीर इंटरनॅशनल नाशिक या संस्थेचे संपूर्ण भारतभर जाळे पसरलेले असून, संपूर्ण भारतभर ४०० शाखा आहेत. नाशिक शाखेचे यात खूप मोठे योगदान असून, समाजासाठी काहीतरी चांगले केले पाहिजे. या भावनेतून या संस्थेतर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, असे प्रतिपादन मोहनलाल लोढा यांनी केले. रोटरी हॉल गंजमाळ येथे झालेल्या कार्यक्रमात उद्योगपती व बेदमुथा ग्रुपचे अध्यक्ष कचरदास बेदमुथा यांना उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मोहनलाल लोढा बोलत होते. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष प्रवीण खाबिया, विक्रीकर सहआयुक्त सुमेरकुमार काले, मोहनलाल साखला, संपतलाल सुराणा, मोहनलाल चोपडा, महावीर इंटरनॅशनल नाशिकचे अध्यक्ष अनिल नाहर उपस्थित होते. तसेच समाजातील काही व्यक्ती आपला परिवार सांभाळून सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, प्रशासकीय क्षेत्रांत आपले महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महान व्यक्तींचा समाजाला परिचर व्हावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले की समाजासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. बेदमुथा यांनी कठीण परिस्थितीतून उद्योगाची उभारणी केली. तसेच शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे. सूत्रसंचालन संगीता बाफना यांनी केले, तर आभार प्रदर्शन अश्विनी कांकरिया यांनी केले. कार्यक्रमास भरत गांग, डॉ. प्रफुल्ल सुराणा, रूपचंद बागमार, दिलीप टाटिया, ललित नाहर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महावीर इंटरनॅशनलचे सामाजिककार्यात मोठे योगदान
By admin | Updated: January 3, 2017 01:33 IST