शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मक्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:53 IST

नायगाव : मका बियाणे खराब निघाल्याने सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथील शेतकºयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईची मागणी करताच पिकास खतांची मात्रा जादा झाल्याने नुकसान झाल्याचा शासकीय अधिकाºयांच्या निष्कर्षाने शेतकºयावर आर्थिक संकट कोसळले आहे. सोनगिरी येथील हिरामण सुकदेव बोडके यांनी गट नंबर ९६ मध्ये दोन एकर क्षेत्रात मका पिकाची लागवड केली ...

ठळक मुद्देखराब बियाणे दोन एकरवरील मक्याची कणसे काढणीपूर्वीच फुटली

नायगाव : मका बियाणे खराब निघाल्याने सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथील शेतकºयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईची मागणी करताच पिकास खतांची मात्रा जादा झाल्याने नुकसान झाल्याचा शासकीय अधिकाºयांच्या निष्कर्षाने शेतकºयावर आर्थिक संकट कोसळले आहे. सोनगिरी येथील हिरामण सुकदेव बोडके यांनी गट नंबर ९६ मध्ये दोन एकर क्षेत्रात मका पिकाची लागवड केली होती. मात्र हे पीक काढणीला येण्याच्या आतच मक्याची कणसे आपोआपच फुटू लागली. थोड्याच दिवसांत लागवड केलेल्या क्षेत्रापैकी निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रातील मका पीक खराब होऊन लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचे बोडके यांच्या लक्षात आले. त्यांनी बियाणे खरेदी केलेल्या दुकानदारास मक्याच्या नुकसानीबाबत सांगितले. संबंधित दुकानदाराने कंपनीच्या अधिकाºयांना शेतकºयाची तक्रार सांगितली. संबंधित कंपनीच्या अधिकाºयांनी शिवार भेट घेऊन झालेल्या नुकसानीच्या भरपाईबाबत लवकरच कळवू असे सांगितले. मात्र पाच दिवस पाठपुरावा करत असताना नंतर हिरामण बोडके यांना उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले. कंपनीचे अधिकारी भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.            आपली फसवणूक झाल्याने बोडके यांनी सिन्नर कृषी अधिकारी, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला तक्रारी अर्ज करून चौकशी करून भरपाईची मागणी केली. संबंधित विभागातील अधिकाºयांनी बोडके यांच्या शेतावर येऊन नुकसान झालेल्या पिकाचा पंचनामा केला. मात्र पाहणीस आलेल्या उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत कानवडे, तालुका कृषी अधिकारी वटाणे, अकोला महाबीजचे तज्ज्ञ बी. एस. रासकर, कृषी पर्यवेक्षक के. जे. कसळकर आदी अधिकाºयांनी मका पिकाची पाहणी करून पंचनामा केला. दोन दिवसांनी दिलेल्या पंचनाम्यात सदर शेतकºयाने मोठ्या प्रमाणात खते टाकल्याने मक्याची कणसे फुटत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अशा आशयाचा निष्कर्ष वाचून शेतकºयाने तीव्र संताप व्यक्त केला. संबंधित कंपनीच्या बियाणांची कोणत्याही प्रकारची चौकशी  न करता कोणतीही माती व पाणी परीक्षण न करता संबंधित अधिकाºयांनी पंचनामा दिल्याने परिसरातील शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. मका बियाणे खराब निघाल्यामुळे माझ्या दोन एकर क्षेत्रातील मका पिकाचे नुकसान झाले. संबंधित कंपनीच्या बियाणांचे परीक्षण न करता व कोणतेही माती व पाणी परीक्षण न करता शासकीय अधिकाºयांनी खतांची मात्रा जादा झाल्याने नुकसान झाल्याचा अहवाल दिल्याने मला या निर्णयाबाबत शंका वाटत आहे. - हिरामण बोडके, सोनगिरी