लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेतील वर्ग एक श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला कायम असून, सोमवारी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षकांच्या बदल्या झाल्या.प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांची दोन दिवसांपूर्वीच नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावरून धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी बदली झाली आहे. दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी मुंबईहून नितीन बच्छाव यांची नाशिकला बदली झाली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातीलच अधीक्षक उदय देवरे यांची जिल्हा स्काउट- गाइड पथकाच्या वेतन अधीक्षकपदी बदली झाल्याचे समजते. गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक पदावर वर्धा येथून पी. आर. पवार यांची नाशिकला बदली झाली आहे. बांधकाम विभाग तीनचे कार्यकारी अभियंता रवींद्र परदेशी यांची जळगाव सार्वजनिक बांधकाममध्ये उत्तर विभागात कार्यकारी अभियंतापदी बदली झाली आहे. जळगाव उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एन. नारखेडे यांची नाशिक जिल्हा परिषदेत रवींद्र परदेशी यांच्या जागी बदली झाली आहे.
खातेप्रमुखांच्या बदल्यांचा सिलसिला कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:27 IST