शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

गिरणारे गावातील मुख्य रस्त्याचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:57 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गिरणारे गावातील मुख्य रस्त्याचे काम सुरु करून दोन दिवसानंतर अचानक काम बंद करण्यात आल्याने गावात या कामाबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

गिरणारे : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गिरणारे गावातील मुख्य रस्त्याचे काम सुरु करून दोन दिवसानंतर अचानक काम बंद करण्यात आल्याने गावात या कामाबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.रस्त्याचे काम अचानक बंद झाल्याने वाहतुकीला व येणाऱ्या जाणाºया नागरिकांच्या दुचाकी घसरून पडण्याच्या घटना वाढल्या असून चारचाकी वाहने पास झाल्यास टायरखालील दगड उडून रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदारांवर व तेथील ग्राहकांवर जाऊन दुखापत होण्याचा घटना घडत असून, ठेकेदाराने रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी गिरणारे गावातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.  नाशिक तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण म्हणून परिसरातील गावांची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या गिरणारे गावातील रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून बंद स्थितीत असल्याने रस्त्याची अवस्था बिकट झाली होती.ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याने आमदार निधीमधून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत हे काम ठेकेदाराकडून करून घेतले जाणार आहे. या कामाला ठेकेदाराने  उशिराने का होईना मात्र सुरुवात केली होती, मात्र कामालाकुठेतरी बाधा आली आणि दोन दिवस सुरू असलेले हे काम अचानकपणे बंद झाले. रस्त्याचे काम बंद होऊन साधारण पंधरा दिवस झाले  मात्र अजून कामाची सुरु वात  झाली नसल्याने गावातील  नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.काम अचानक बंद करायचे नेमके कारण काय?रस्त्याच्या मधोमध जेसीबीच्या साहाय्याने खणल्याने रस्त्यात मोठा खड्डा तयार होऊन त्याचे बारीक बारीक दगड गाडीच्या टायरखाली येऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील दुकानात जाऊन दुखापत व सामानाची नुकसान होऊन रस्त्यावरची धूळ उडून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बंद असलेले हे काम त्वरित सुरु कारण्याची मागणी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाºयांकडे केली.४या रस्त्यावर येणाºया जाणाºया शाळकरी मुलांना सायकलीवरून येता जाता खडीवरून घसरून पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. हे काम चालू करतांना मात्र याठिकाणी बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित राहत नसल्याने ठेकेदार नेमके कशे काम करतो याचा अंदाज लावणे कठीणच असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.४त्यातल्या त्यात दोन दिवसानंतर हे काम अचानक बंद करायचे नेमके कारण काय? असा सवाल नागरिकांनी केला आहे. याठिकाणी १० गावाचा मिळून दर गुरु वारी आठवडे बाजार भरत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांना व वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद