शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम साहित्य टाकून मुख्य रस्ता केला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 00:46 IST

नांदगाव : शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून जमीनमालकाने रस्ताच बंद करून टाकल्याने गुरुकृपा नगर भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार माणिकचंद कासलीवाल एज्युकेशन संस्थेचे सरचिटणीस विजय चोपडा व अन्य नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देनांदगाव : गुरुकृपा नगरातील रहिवाशांची गैरसोय

नांदगाव : शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून जमीनमालकाने रस्ताच बंद करून टाकल्याने गुरुकृपा नगर भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार माणिकचंद कासलीवाल एज्युकेशन संस्थेचे सरचिटणीस विजय चोपडा व अन्य नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.याबाबत तक्रारीत म्हटले आहे, सर्वे नंबर ४८/अ व ४९/७ लगतचा व जे.टी. के. इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेपासून गुरुकृपा कॉलनी कडे जाणारा, नगर परिषद नांदगाव यांनी तयार केलेला रस्ता सर्वे नंबर ४९/७ या जमिनीच्या मालकांनी भर रस्त्यात दगड व वीटांचे ४ ट्रॅक्टर व बाभळीचे काटयांच्या फांद्या टाकून बंद केला आहे. हा रस्ता नांदगाव शहराशी जोडणारा मुख्य रस्ता असून तो अचानक बंद झाल्याने गुरुकृपा कॉलनी, नरेंद्र नगर मधील राहणाऱ्या रहिवाशांची गैरसोय झाली आहे. तसेच जेटीके इंग्लिश मिडियम स्कूल, सौ. कमलाबाई मणिकचंद कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची, शिक्षकांची व पालकांची अडचण निर्माण झाली आहे. रहदारीचा रस्ता असल्याने नोकरदार वर्ग, विद्यार्थी, प्रवासी यांची वर्दळ या रस्त्यावर नेहमीच असते. मात्र हा रस्ता बंद केल्याने सर्वांनाच गावामध्ये जाण्या - येण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. संध्याकाळच्या वेळी बाजूने फिरून जातांना अंधार असतो त्यामुळे विद्यार्थिनी, महिला व जेष्ठ नागरिक यांचेसाठी धोकादायक स्थिति निर्माण झाली आहे.सदर रस्ता नगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यामध्ये आहे. सदर रस्ता खुला करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा