शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘महिंद्रा’च्या गुंतवणुकीमुळे उद्योग क्षेत्राला मोठी चालना

By admin | Updated: February 13, 2017 00:18 IST

इगतपुरीत विस्तारीकरण : उद्योजकांकडून निर्णयाचे स्वागत

सातपूर : महिंद्रा अ‍ॅण्ड महिंंद्रा कंपनीने नाशिक व इगतपुरी येथील प्रकल्पात दीड हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीमुळे नाशिक जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. नवीन गुंतवणूक होऊ शकते. तर लघु व मध्यम उद्योगांना बूस्ट नक्कीच मिळणार आहे. या गुंतवणुकीमुळे उद्योग क्षेत्राला अच्छे दिन येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मुंबई येथे राज्य शासनाच्या वतीने भरविण्यात आलेल्या मेक इन इंडिया प्रदर्शनातच महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राने नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. ती आता मूर्तस्वरूपात होत आहे. नाशिकमध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून एकही मोठा उद्योग प्रकल्प आलेला नाही. नाशिकमध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी निमाच्या वतीने मे महिन्यात मुंबईत ‘मेक इन नाशिक’च्या आयोजनाची तयारी सुरू आहे. अशातच महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीने नाशिक आणि इगतपुरीच्या कारखान्यात पंधराशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेचे उद्योग क्षेत्रात स्वागत केले जात आहे. लघु आणि मध्यम उद्योगांना या गुंतवणुकीमुळे बूस्ट मिळणार आहे. रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. नवीन गुंतवणूक येण्याची शक्यता वाढणार आहे. नवउद्योजकांना स्वत:चा उद्योग सुरू करण्याची संधी मिळणार आहे. जुन्या व्हेंडर्सला कामे मिळतील आणि नवीन व्हेंडर्स तयार होतील. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत. एकंदरीत उद्योग क्षेत्राला या गुंतवणुकीमुळे आशेचा किरण दिसत आहे. (वार्ताहर)