सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्र अँड महिंद्र कामगार संघटनेची निवडणूक घेण्यात यावी म्हणून विरोधकांनी जिल्हाधिकारी आणि न्यायालयात धाव घेतली होती. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार २०२१ ते २०२४ या कालावधीसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, खजिनदार, चिटणीस, सहचिटणीस, कमिटी मेंबर अ आणि ब अशा आठ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार आहे. ३ व ४ रोजी अर्ज विक्री, ५ रोजी अर्ज दाखल करणे, माघारीची अंतिम मुदत ९ फेब्रुवारी तर १३ फेब्रुवारी रोजी कंपनीच्या आवारात मतदान आणि त्यानंतर मतमोजणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी २ हजार ३०० मतदार आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळून ही निवडणूक घेण्यात येणार आहे.
महिंद्र कामगार संघटनेची निवडणूक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST