शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

माहेश्वरी मंडळातर्फे वावीच्या सरपंचांसह सदस्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : माहेश्वरी महिला मंडळ व माहेश्वरी युवक मंडळाच्यावतीने वावी येथील नवनिर्वाचित सरपंच कन्हैयालाल भुतडा, उपसरपंच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सिन्नर : माहेश्वरी महिला मंडळ व माहेश्वरी युवक मंडळाच्यावतीने वावी येथील नवनिर्वाचित सरपंच कन्हैयालाल भुतडा, उपसरपंच मीना नवनाथ काटे यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. विकासकामे करुन गावाची ओळख आगळेवेगळे व आदर्श गाव म्हणून निर्माण करावी, असे आवाहन आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले.

विठ्ठलदास आसावा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर विकास संस्थेचे अध्यक्ष विजय काटे, माजी सरपंच रामनाथ कर्पे, ह. भ. प. पांडुरंगगिरी महाराज गिरी, पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता काटे, डॉ. कमलाकर कपोते, निरज भट्टड, संतोष पलोड, आनंदा कांदळकर यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

माहेश्वरी महिला व युवक मंडळाच्यावतीने सरपंच कन्हैयालाल भुतडा, उपसरपंच मीना काटे, ग्रामपंचायत सदस्य विजय काटे, प्रशांत कर्पे, संदीप राजेभोसले, रामराव ताजणे, प्रेमलता जाजू, मीना मंडलिक, दीपाली खाटेकर, साधना घेगडमल, आश्विनी वेलजाळी यांचा माहेश्वरी पगडी, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गावाच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन विजय काटे यांनी केले. यावेळी विजय सोमाणी, शामसुंदर मालपाणी, द्वारकानाथ जाजू, कैलास जाजू, प्रदीप मंडलिक, संदीप भोसले, विनायक घेगडमल, आशिष माळवे, गणेश वेलजाळी, विजयकुमार जाजू, अशोक मालपाणी, ओंकार मालपाणी, संतोष जोशी, मदनलाल कर्नावट, ओंकार धूत, राजेंद्र खांबेकर, दत्तात्रय नवले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. जयेश मालपाणी यांनी सूत्रसंचालन केले तर माहेश्वरी महिला मंडळाच्या सचिव मंजुश्री मालपाणी यांनी आभार मानले. (वा.प्र)

चौकट-

जाजू, सुपेकर यांचा सत्कार

नाशिक जिल्हा माहेश्वरी सभेच्यावतीने दिला जाणारा ‘महेश कर्मवारी पुरस्कार’ द्वारकानाथ जाजू यांना मिळाल्याबद्दल तसेच ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार’ मिळाल्याबद्दल रवींद्र सुपेकर यांचा माहेश्वरी महिला मंडळ व माहेश्वरी युवक मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांचा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरव करण्यात आला.

फोटो - ११ वावी माहेश्वरी

वावी येथे माहेश्वरी महिला व युवक मंडळाच्यावतीने सरपंच कन्हैयालाल भुतडा, उपसरपंच मीना काटे यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ह. भ. प. पांडुरंगगिरी महाराज गिरी, विजय काटे, रामनाथ कर्पे यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व माहेश्वरी युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

===Photopath===

110321\11nsk_11_11032021_13.jpg

===Caption===

फोटो - ११ वावी माहेश्वरी वावी येथे माहेश्वरी महिला व युवक मंडळाच्यावतीने सरपंच कन्हैयालाल भुतडा, उपसरपंच मीना काटे यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ह. भ. प. पांडुरंगगिरी महाराज गिरी, विजय काटे, रामनाथ कर्पे यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व माहेश्वरी युवक मंडळाचे कार्यकर्ते.