शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भाषेच्या संवर्धनासाठी साहित्यनिर्मिती आवश्यक महेश झगडे : विभागीय आयुक्त कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 02:00 IST

नाशिकरोड : मराठी भाषेच्या प्रगल्भतेसाठी व संवर्धनासाठी विविध विषयांवरील साहित्यनिर्मिती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.

ठळक मुद्देमराठी साहित्य पोहोचविण्याची गरज मराठी भाषा हे मुख्य दार

नाशिकरोड : मराठी भाषेच्या प्रगल्भतेसाठी व संवर्धनासाठी विविध विषयांवरील साहित्यनिर्मिती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात झगडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कवी किशोर पाठक, अपर आयुक्त जोतिबा पाटील, उपायुक्त दिलीप स्वामी, सुखदेव बनकर, प्रवीण पुरी, माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे, पी.बी. वाघमोडे, उन्मेष महाजन, तहसीलदार एस. डी. मोहिते आदी उपस्थित होते.यावेळी झगडे म्हणाले की, मराठी भाषेत लवचिकता आहे. काळानुसार मराठी भाषेच्या स्वरूपात आणि उपयोगात बदल झाले. भाषेत होणारे बदल स्वीकारणे आवश्यक आहे. दीर्घकाळापासून असलेली मराठी भाषेची वैभवशाली परंपरा लक्षात घेता तिच्या विकासाबाबत भीती बाळगण्याचे कारण नाही. इतर भाषिकांमध्ये मराठी साहित्य पोहोचविण्याची गरज असल्याचे झगडे यांनी सांगितले. यावेळी कवी किशोर पाठक म्हणाले, कुसुमाग्रजांच्या कवितेत निसर्ग आणि जीवन यांचा सुंदर समन्वय आहे. त्यांनी प्रेमाची कविता लिहिताना जगण्याची शिकवण दिली आणि माणुसकीचा धागा सोडला नाही. इंग्रजी भाषा जगाचे ज्ञान मिळवण्यासाठी असणारी खिडकी असली तरी जीवनाचे ज्ञान मिळवण्याचे मराठी भाषा हे मुख्य दार आहे, असे पाठक यांनी सांगत कुसुमाग्रजांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी उपायुक्त दिलीप स्वामी, माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार तहसीलदार एस.डी. मोहिते यांनी मानले.