शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्यात अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा मिळण्यासाठी महावितरण सज्ज

By admin | Updated: November 8, 2014 00:54 IST

कुंभमेळ्यात अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा मिळण्यासाठी महावितरण सज्ज

नाशिक : कुंभमेळ्यात अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा मिळण्यासाठी महावितरण सज्ज झाले असून, त्या अनुषंगाने नाशिकसह त्र्यंबकेश्वर मध्ये विविध विद्युतीकरणाची कामे सुरु झाली आहेत.सिंहस्थासाठी विद्युतीकरण करण्याकरिता शासनाने २४.७९ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. सिंहस्थ काळात योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी महावितरणने ३३/११ केव्ही तपोवन व गणेशवाडी उपकेंद्राची उभारणीची कामे जोमाने सुरु केली आहेत व त्यासाठी लागणाऱ्या ३३ केव्ही उच्च दाबाची १.२ कि.मी. वाहिनीचे काम आता पूर्णत्वास आले असून, ११ केव्ही उच्च दाबाचे एक कि.मी. वीजवाहिनी भूमिगत करणाचे काम पूर्ण झाले आहे.वाढीव वीजपुरवठ्याची मागणी करण्यासाठी नाशिक येथे सात, तर त्र्यंबकेश्वर येथे १४ नवीन रोहित्रांची उभारणी करण्यात आलेली आहे. तसेच नाशिक येथील ११ ठिकाणच्या रोहित्रांची क्षमता वाढ करण्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. त्र्यंबकेश्वरला सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी खंबाळे उपकेंद्र ते त्र्यंबकेश्वर उपकेंद्र अशी अतिरिक्त १३ कि.मी. उच्चदाब वाहिनी प्रस्तावित असून त्यापैकी २.५ कि.मी. उच्चदाब वाहिनी उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. इगतपुरी तालुक्यातील कावनाई येथेदेखील पोल उभारणे, पर्यायी विद्युतपुरवठा करण्यासाठी ११ केव्ही वाहिनीची उभारणी करण्यात आली आहे. तसेच घोटी उपकेंद्र येथे ब्रेकर व बेची उभारणी करणे, नवीन सिंगल फेज रोहित्राकरिता लघुदाब वाहिनीची व रोहित्राची उभारणी करणे, कंडक्टर बदलवणे इत्यादी कामे प्रगतिपथावर आहे. सप्तशृंगगडावर नवीन रोहित्रांची उभारणी करणे, भार विभाजित करण्यासाठी नवीन १०० केव्ही क्षमतेचे रोहित्र उभारणी करणे, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी रोहित्रे सुरक्षित जागी हलविणे इत्यादि कामे पूर्ण झाली आहेत.सिंहस्थ निधीव्यतिरिक्त महावितरणने शहरी अर्बनायझेशन व मॉडर्नायझेशनची अनेक विद्युतीकरणाची कामे नाशिक व त्र्यंबकेशवर येथे केले आहेत. याशिवाय महावितरणच्या पायाभूत सुविधा योजनाअंतर्गत नाशिक शहर -१ व शहर-२ अंतर्गत एकूण आठ उपकेंद्र प्रस्तावित अूसन, त्याकरिता जागा ताब्यात घेण्याचे काम प्रगती पथावर आहे.सिंहस्थ संदर्भातील सर्व विद्युतीकरणाची कामे मार्च २०१५ पूर्ण करण्याचे महावितरणचे ध्येय असून, त्यादृष्टीने नियोजन महावितरणने केलेले आहे. (प्रतिनिधी)