शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सिडको भागात महावितरणचा प्रताप

By admin | Updated: June 19, 2017 19:09 IST

भरमसाठ बिल अदा; संतप्त ग्राहकांचा अधिकाऱ्यांना घेराव

सिडको : वेळेत वीज मीटरचे वाचन न करणे, अचानक वीज अधिभार लावणे यांबरोबरच काही भागात तर चक्क सरासरी बिल देणे या कारणांमुळे सिडको भागातील बहुतांश ग्राहकांना याचा आर्थिक फटका बसला असून, भरमसाठ बिल आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. महावितरणचा ताप परंतु ग्राहकांना मात्र आर्थिक भुर्दंड बसत असल्याने याबाबत आज ग्राहकांनी थेट महावितरणच्या सिडकोतील सिम्बॉयसिस शेजारील मुख्य कार्यालयात अभियंत्यांनाच घेराव घालून ठिय्या मांडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना दरमहा देण्यात येणारे वीज बिल हे वेळेवर दिले जात नसल्याचे याआधीदेखील अनेकदा उघडकीस आले आहे. महावितरणने यंदा सिडकोेतील मोरवाडी, तुळजाभवानी चौक, साईबाबानगर, उत्तमनगर, विजयनगर यांसह संपूर्ण सिडको भागातील वीज ग्राहकांना भरमसाठ बिल अदा केल्याचे दिसून येत आहे. याआधी कधीही एवढे बिल आलेले नाही जेवढे बिल या महिन्यात प्राप्त झाल्याने ग्राहकांनी महावितरणच्या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ग्राहकांनी आज महावितरण कंपनीच्या सिडको भागातील सिम्बॉयसिस कॉलेजजवळील कार्यालयात नगरसेवक किरण गामणे यांना बरोबर घेत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी जादा बिल आल्यानंतरही दखल घेतली जात नसल्याने ग्राहकांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात घेराव घालत थेट टेबलावर ठिय्या मांडला. याप्रसंगी दिलीप भास्कर, सुभाष लांडगे, यमुनाबाई सानप, रशिदा शेख यांसह शेकडो ग्राहकांनी जादा बिल आल्याने त्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. परंतु यानंतरही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली होती. ज्या ग्राहकांना याआधी हजार रुपये बिल येत होते त्यांना थेट २१ हजारपर्यंत, तर चारशे ते पाचशे रुपये बिल येत असलेल्या ग्राहकांना पंधराशे ते दोन हजार रुपये इतके बिल आले आहे.