शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेट्टीसाठी महासभा तहकुबीचे नाट्य भाजपाची खेळी : आज पुन्हा महापालिकेची महासभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:15 IST

नाशिक : स्वीकृत सदस्य नियुक्तीनंतर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महापौरांनी सोमवारी (दि. २०) बोलाविलेली महासभा तहकूब करण्याची घोषणा केली असली तरी सध्या कारागृहात असलेले भाजपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांचे नगरसेवकपद वाचविण्यासाठीच पक्षाकडून महासभा तहकुबीचे नाट्य घडविले गेल्याची चर्चा आहे. पाच महिन्यांपासून गैरहजर असलेल्या शेट्टी यांना सोमवारच्या महासभेला हजर राहणे अनिवार्य होते, अन्यथा कायद्यानुसार त्यांचे पद रद्दबातल ठरू शकले असते; परंतु जामीन मिळूनही न्यायालयाचा अधिकृत आदेश प्राप्त होऊ न शकल्याने शेट्टी सोमवारच्याही महासभेला हजर होऊ शकले नाहीत. त्यामुळे महापौरांनी मंगळवारी (दि. २१) तहकूब महासभा बोलावली असून, त्यात शेट्टींची हजेरी लागल्यास पद वाचू शकते.

ठळक मुद्देशेट्टीसाठी महासभा तहकुबीचे नाट्य भाजपाची खेळी : आज पुन्हा महापालिकेची महासभा

नाशिक : स्वीकृत सदस्य नियुक्तीनंतर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महापौरांनी सोमवारी (दि. २०) बोलाविलेली महासभा तहकूब करण्याची घोषणा केली असली तरी सध्या कारागृहात असलेले भाजपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांचे नगरसेवकपद वाचविण्यासाठीच पक्षाकडून महासभा तहकुबीचे नाट्य घडविले गेल्याची चर्चा आहे. पाच महिन्यांपासून गैरहजर असलेल्या शेट्टी यांना सोमवारच्या महासभेला हजर राहणे अनिवार्य होते, अन्यथा कायद्यानुसार त्यांचे पद रद्दबातल ठरू शकले असते; परंतु जामीन मिळूनही न्यायालयाचा अधिकृत आदेश प्राप्त होऊ न शकल्याने शेट्टी सोमवारच्याही महासभेला हजर होऊ शकले नाहीत. त्यामुळे महापौरांनी मंगळवारी (दि. २१) तहकूब महासभा बोलावली असून, त्यात शेट्टींची हजेरी लागल्यास पद वाचू शकते.महासभेवर खुल्या जागांवर धार्मिक स्थळांचे बांधकाम अनुज्ञेय करण्यापासून ते तीन अधिकाºयांच्या स्वेच्छानिवृत्तीसंबंधीचे महत्त्वाचे प्रस्ताव धोरणात्मक निर्णयासाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे महासभेकडे लक्ष लागून होते; परंतु स्वीकृत सदस्यांची नियुक्तीची घोषणा केल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी आश्चर्यकारकरीत्या सदर सदस्यांच्या आनंदोत्सवासाठी महासभा तहकूब करत असल्याचे जाहीर केले आणि या आनंदोत्सवाबाबत विरोधकही बुचकळ्यात पडले. महापौरांनी सोमवारची महासभा तहकूब करत ती मंगळवारी (दि. २१) दुपारी २ वाजता बोलावली आहे. सभापटलावर धोरणात्मक विषय असताना महापौरांनी महासभा तहकूब केल्याने सदर खेळी ही भाजपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांचे पद वाचविण्यासाठीच असल्याची चर्चा सुरू झाली. एका गुन्हेगाराच्या खुनात सहभागी असल्याच्या आरोपावरून पंचवटीतील प्रभाग ४ मधील भाजपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांना २६ मे २०१७ रोजी अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून शेट्टी हे नाशिकरोड कारागृहात आहेत. आजच्या हजेरीकडे लक्षमहापौरांनी सोमवारी महासभेचे कामकाज पार पाडले असते तर नोव्हेंबरची मासिक सभा होऊन सलग सहा महिने गैरहजर राहिल्याबद्दल हेमंत शेट्टी यांना पद गमवावे लागले असते. परंतु, महापौरांनी सोमवारची महासभा केवळ स्वीकृत सदस्यत्वाची घोषणा करत मंगळवार दुपारपर्यंत तहकूब केली. त्यामुळे मंगळवारी होणाºया सभेला शेट्टी यांनी हजेरी लावल्यास त्यांचे पद वाचू शकते. दरम्यान, महापौरांनी मात्र सोमवारी महासभेवर धोरणात्मक विषय असल्याने आणि प्रभारी आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणारे जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने सभेचे कामकाज तहकूब केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे, तर भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी शेट्टी यांच्या पदाला कोणताही धोका नसल्याचे सांगत न्यायालयातील काही केस लॉचाही त्यांनी दाखला दिलेला आहे.