मालेगाव : येथील अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील काळात झालेले बॉम्बस्फोट आणि दंगलींमुळे काहीशी बदनामी झालेल्या मालेगावच्या संमिश्र वस्तीच्या शहरात सुनील कडासने यांच्या काळात बंधुत्व व सौहार्दता जोपासली गेली आहे. कडासने यांनी मालेगाव शहराची मानसिकता लक्षात घेऊन पोलीस दलातर्फे विविध उपक्रम राबविले. त्यामुळे शहरात अनेक वर्षांपासून शांतता व सलोखा टिकून आहे. ५ आॅक्टोबर रोजी मुंबईत राज्यपालांच्या हस्ते त्यांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कडासने यांना महात्मा गांधी शांतता पुरस्कार
By admin | Updated: October 4, 2015 23:05 IST