शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

Maharashtra Voting: नाशिक जिल्ह्यात मतदानाला उत्साहात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 08:03 IST

नाशिक - जिल्ह्यातील पंधरा मतदार संघात आज सकाळपासून मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला. ढगाळ वातावरण असतानाही शहरात मतदारांचा मोठा उत्साह ...

नाशिक - जिल्ह्यातील पंधरा मतदार संघात आज सकाळपासून मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला. ढगाळ वातावरण असतानाही शहरात मतदारांचा मोठा उत्साह असून अनेक केंद्रांवर सकाळी पावणे सात वाजेपासून मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली आहे. बीएलओ उपलब्ध नसेल त्या ठिकाणी नागरिकांनी मतदार यादीत नाव शोधून घेत तसेच मोबाईल अॅपचा वापर करीत नावे शोधून मतदान केले आहे. मतदान यंत्रे बिघाडाच्या किरकोळ तक्रारी असून नाशिक मध्य मतदार संघात द्वारका येथील अटल बिहारी वाजपेयी स्कुलमध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदारांना ताटकळावे लागले. नाशिक शहरासह जिल्ह्यात सर्वच मतदार संघात भल्या सकाळी उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला.

नाशिक जिल्ह्यात एकुण १५ विधानसभा मतदार संघ असून त्यात १४८ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात एकुण ४५ लाख २४ हजार मतदार असून त्यात २३ लाख ७६ हजार ४०५ पुरूष मतदार आहेत. तर २१ लाख ६८ हजार ३०९ महिला मतदार आहेत. दिव्यांगांना मतदान करता यावे यासाठी साडे चारशे व्हील चेअरची सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.  जिल्ह्यात एकुण४ हजार ५७९ मतदान केंद्रे आहेत.  त्यातील २५६ मतदान संवेदनशील आहेत. तर ४५८ मतदान केंद्रांवरून थेट वेबकास्टींगच्या मदतीने हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. मतदान केंद्रांवर मतदारांच्या सोयीसाठी पाण्यापासून प्रथमोपचारापर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. 

  नाशिक जिल्ह्यात मतदान शांतते पार पडावे यासाठी पोलीसांनी विशेष दक्षता घेतली आहे. मालेगाव आणि निफाड येथे ड्रोनच्या माध्यमातून दाट वस्तीच्या मतदान केंद्रांवर नजर ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर सशस्त्र पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यासाठी सशस्त्र पोलीस दलाच्या ११ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.  नाशिक शहरात ४५० गुन्हेगार तात्पुरत्या स्वरूपात हद्दपार करण्यात आले आहेत.

टॅग्स :nashik-central-acनाशिक मध्य