नाशिक : भारतीय क्रिकेट बोर्डच्या वतीने घेण्यात येणाऱ्या रणजी एकदिवसीय (विजय हजारे चषक) सामन्यांसाठी महाराष्ट्राच्या संघात नाशिकच्या साजीन सुरेशनाथ याची निवड झाली आहे़ विजय हजारे चषकासाठी महाराष्ट्राच्या संघाची नुकतीच पुणे येथे घोषणा करण्यात आली यामध्ये मध्यमगती गोलंदाज म्हणून साजीनची निवड झाली आहे़ यापूर्वी साजीनने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे़ यावर्षी झालेल्या आमंत्रितांच्या स्पर्धेत जिल्हा संघाने साजीनच्या नेतृत्वाखाली ४३ वर्षानंतर विजय संपादित केला होता़ या स्पर्धेत साजीनने आपली गोलंदाजीची तसेच फलंदाजीचीही चमक दाखवत संभाव्या महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवले होते़ या संघाच्या पुणे येथे केरळ व इंदोर येथे मध्य प्रदेश संघाविरुद्ध झालेल्या निवड चाचणीत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती़ या कामगिरीच्या जोरावर त्यांची राज्याच्या संघात निवड झाली आहे़
महाराष्ट्र रणजी संघात नाशिकच्या साजीनची निवड
By admin | Updated: November 7, 2014 00:47 IST