शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र चेंबरतर्फे जीएसटी प्रशिक्षणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:41 IST

 नाशिक : महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर आणि एमएसएमई-डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जीएसटीसंबंधी व्यवस्थापन विकास प्रशिक्षण कार्यक्र मास पद्मश्री बाबुभाई राठी सभागृह, सारडा संकुल येथे सुरुवात झाली आहे. चेंबरतर्फे १२ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत दुपारी ४ ते सायंकाळी ६.३० या वेळेत सलग पाच दिवस ...

ठळक मुद्देजीएसटीसंबंधी व्यवस्थापन विकास प्रशिक्षण सलग पाच दिवस हा प्रशिक्षण कार्यक्रम

 

नाशिक : महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर आणि एमएसएमई-डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जीएसटीसंबंधी व्यवस्थापन विकास प्रशिक्षण कार्यक्र मास पद्मश्री बाबुभाई राठी सभागृह, सारडा संकुल येथे सुरुवात झाली आहे. चेंबरतर्फे १२ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत दुपारी ४ ते सायंकाळी ६.३० या वेळेत सलग पाच दिवस हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू राहणार आहे.या प्रशिक्षण कार्यक्र माच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कुठलाही नवीन कर लागू होण्याआधी व झाल्यानंतर सुरुवातीला संभ्रम असतो. व्हॅटबाबतही सुरुवातीला असेच वातावरण होते. जीएसटी कर नवीन आहे. यातील बदल आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यासाठी जीएसटीसंबंधीच्या सूचना नियमित अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामुळे आपले जीएसटीविषयीचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचा सर्वांना फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी एमएसएमईचे समन्वयक गिरीश दिवाण यांनी प्रशिक्षण कार्यक्र मात जीएसटी कायदा आणि त्याचे फायदे या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात डिफरन्स टाईप आॅफ ट्रान्झक्शन्स अ‍ॅण्ड कोड (एचएसएन, एसएसी आदी), इनपुट टॅक्स के्र डिट सिस्टिम, रेग्युलर स्कीम, कम्पोझिशन स्कीम आदी विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. यावेळी चेंबरचे सचिव चंद्रकांत दीक्षित, प्रशिक्षक स्वाती पाटील, चेतन बंब, सोनल दगडे, सुनीता फाल्गुने, अंजू सिंघल, सचिन जाधव, अमित अलई, माधवराव भणगे आदींसह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन हेमांगी दांडेकर यांनी केले.