नाशिक : जिल्हा परिषदेच्या वतीने ३१ मे रोजी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त सकाळी ११ वाजता रावसाहेब थोरात सभागृहात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोेमवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास वरिष्ठ लेखाधिकारी डालकरी, उपाध्यक्षाचे स्वीय सहायक विजयकुमार हळदे, शिक्षण सभापतींचे स्वीय सहायक रवींद्र थेटे, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश थेटे, जनसंपर्क अधिकारी गौतम अग्निहोत्री, कैलास मंडलिक, शोभा खैरनार, छाया पाटील, योगेश घाणे, सुनील मोगरे, मंगेश केदारे, विशाल कामडी, जीवन पारधी आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेत महाराणा प्रताप जयंती
By admin | Updated: June 1, 2014 01:18 IST