शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महापुरे येती, तेथे ‘गोदापार्क’ वाहूनी जाती!

By admin | Updated: August 4, 2016 01:53 IST

राजहट्टाचे परिणाम : गोदावरीच्या पूररेषेत असलेला सदर ड्रीम प्रोजेक्ट गुंडाळला जाणार?;

 नाशिक : गंगापूररोडवरील आसारामबापू पुलालगत रिलायन्सच्या माध्यमातून सुमारे ६०० मीटरचा साकारण्यात येणाऱ्या ‘गोदापार्क’ प्रकल्पामागील दुष्टचक्र संपण्याची काही चिन्हे दिसेनात. राजहट्टापायी गोदावरीच्या पूररेषेत उभा राहत असलेला गोदापार्क प्रकल्प गोदामाईच्याच रौद्ररूपाने पार उद्ध्वस्त करून टाकला. यापुढेही वारंवार पुराच्या पाण्याची झळ पोहोचणार असल्याने राज यांचा ड्रीम प्रोजेक्ट गुंडाळला जाणार काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. गेल्या १२ ते १३ वर्षांपासून नाशिककरांना राज ठाकरे यांनी ‘गोदापार्क’चे स्वप्न दाखविले आहे. अगोदर रामवाडी पूल ते इंद्रप्रस्थ पुलापर्यंत तयार केलेल्या गोदापार्कचे रूपांतर ‘जॉगिंग ट्रॅक’मध्ये झाल्यानंतर आसारामबापू पुलालगत रिलायन्स उद्योग समूहाच्या माध्यमातून ६०० मीटरचा गोदापार्क साकारण्यास प्रारंभ करण्यात आला. गोदावरीच्या पूररेषेत सदर प्रकल्प अजिबात तग धरणार नाही, अशी टीका वारंवार विरोधकांनी करूनही राजहट्ट कायम राहिला आणि महापालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर ‘गोदापार्क’ने पुन्हा एकदा उचल खाल्ली. रिलायन्स फाउण्डेशनने पर्यटन स्थळ म्हणून गोदापार्क आकर्षित व्हावा यासाठी प्रयत्न केले. आसारामबापू पुलालगत असलेल्या गोदाकाठावर हिरवळ लावून नाशिककरांचे लक्ष वेधले. या वर्षाच्या सुरुवातीलाच गोदापार्क प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचा मनसुबा मनसेने आखला होता परंतु कोरड्या पडलेल्या पात्रामुळे गोदापार्कचे सौंदर्य हरवल्याने ‘गोदेला पाणी तर येऊ द्या’ अशी भूमिका मनसे नेत्यांकडून घेतली गेली आणि उद्घाटनाला विलंब होत गेला. मागील महिन्यात गोदापार्कच्या उद्घाटनाची घटिका समीप आल्याचा सांगावा ‘कृष्णकुंज’वरून आला परंतु १० आणि ११ जुलैला झालेल्या पावसामुळे या मोसमातील पहिला पूर गोदावरीला आला. या पुरामध्येच ‘गोदापार्क’चे नुकसान झाले. गोदापार्क प्रकल्प अद्याप रिलायन्सने महापालिकेकडे हस्तांतरित केलेला नसल्याने तेच प्रकल्पाची दुरुस्ती करतील, असा पवित्रा घेतला. रिलायन्समार्फत पुन्हा दुरुस्तीला वेग आला असतानाच मंगळवारच्या महापुराने तर गोदापार्कची अक्षरश: वाट लागली. ठिकठिकाणी फरशा उखडून पडल्या आहेत. दीपस्तंभ कोलमडून पडले आहेत. हिरवळ नष्ट झाली आहे. नारळाची झाडे कलली आहेत. पुन्हा गोदापार्क उभा करण्यास बराच कालावधी जाणार आहे आणि तोपर्यंत नाशिक महापालिकेत सत्तांतर झाले तर ‘गोदापार्क’चे भवितव्य अंधांतरीच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)