शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

जानेवारीत भरणार ‘महापेक्स-२०१६’

By admin | Updated: December 7, 2015 22:27 IST

छंदांचा राजा : टपाल तिकिटांच्या ४०० फ्रेम होणार प्रदर्शित

नाशिक : जागतिक पातळीवर टपाल तिकिटांचा छंद अनेकांनी जोपासला आहे. अशा लोकप्रिय छंद असलेल्या देशभरातील संग्रहकर्त्यांचा महाकुंभ अर्थात ‘महापेक्स-२०१६’ राज्यस्तरीय दोन दिवसीय प्रदर्शन येत्या जानेवारी महिन्यात शहरात होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल अशोक कुमार दास यांनी केली. पुणे महामार्गावरील उपनगरमधील टपाल भांडारगृहाच्या आवारात जानेवारी महिन्याच्या १६ तारखेपासून ‘महापेक्स-२०१६’ला प्रारंभ होणार आहे. सदर प्रदर्शन दोन दिवस सुरू राहणार असून, यामध्ये भारतभरातून टपाल तिकिटांचे संग्रहकर्ते सहभागी होणार आहेत. तसेच महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांमधील संग्रहकर्त्यांसाठी वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. सुमारे शंभर ते दीडशे संग्रहकर्ता प्रदर्शनात सहभागी होणार असल्याचे दास यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी औरंगाबाद विभागाचे जनरल पोस्ट मास्तर प्रणव कुमार उपस्थित होते.टपाल तिकिटांना कागदपत्रांचे राजदूत असेही म्हटले जाते. या टपाल तिकिटांविषयीची माहिती व जागरूकता व्हावी, तसेच तरुण पिढीमध्ये टपाल तिकिटांद्वारे देशाची संस्कृती उलगडली जावी, या उद्देशाने नाशिक शहरात सुमारे सतरा वर्षानंतर ‘महापेक्स-२०१६’ प्रदर्शन आयोजित क रण्यात येणार असल्याचे दास यांनी यावेळी बोलताना सांगितले.

विद्यार्थ्यांना मोफत सहभागाची संधी    टपाल तिकिटांचा संग्रह करणार्‍या शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ‘महापेक्स-२0१६’ प्रदर्शनात नि:शुल्क सहभागाची संधी आहे. युवा गट व बाह्य स्पर्धात्मक गटासाठी प्रवेश शुल्क माफ करण्यात आले आहे. अन्य गटासाठी प्रदर्शनामध्ये सहभाग घेण्यासाठी प्रतिफ्रेम रुपये शंभर याप्रमाणे सहभाग शुल्क भरावे लागणार आहे. प्रवेशासाठीचे नमुना अर्ज शहरातील मुख्य टपाल कार्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.