शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
7
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
8
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
9
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
10
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
11
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
12
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
13
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
14
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
15
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
16
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
17
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
18
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
19
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
20
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...

महंत म्हणतात ‘हो गया’ : प्रशासनाची दोन दिवस मुदत

By admin | Updated: July 7, 2015 01:07 IST

जागावाटपात संदिग्धता

नाशिक : तपोवनात साकारणाऱ्या साधुग्राममध्ये महापालिकेने विकसित केलेल्या प्लॉटचे आखाडे, खालशांना वाटप करण्यासाठी सोमवारी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत जागावाटपाचा मुद्दा बाजूला राहून साधू-महंतांच्या मागण्यांवरच चर्चा होऊन संपुष्टात आली. महंत ग्यानदास यांनी बैठकीनंतर ‘बटवारा हो गया’ असे जाहीर केले, तर प्रशासनाने जागावाटपाबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्याचे सांगून यासंदर्भातील संदिग्धता कायम ठेवली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे बोलाविण्यात आलेल्या या बैठकीस तीन आखाडे, १८ अनी आखाडे व खालसा प्रमुखांच्या उपस्थितीत प्रारंभी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांनी आजवर केलेल्या कामांचे सादरीकरण केले. तपोवनात साकारण्यात येणाऱ्या साधुग्राममध्ये महापालिकेने १५३७ प्लॉट विकसित केले असून, काही सेक्टरचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही, असे असतानाही प्रशासनाने गेल्याच आठवड्यात सर्व आखाडे, खालशांच्या प्रमुखांना पत्र पाठवून जागावाटपाबाबत सोमवारी बैठक घेण्यात येत असल्याचे कळविले होते. त्यानुसार सकाळी अकरा वाजेपासूनच साधू-महंतांनी गर्दी केली होती. प्रत्यक्षात या बैठकीत जागावाटपाचा काहीच मुद्दा उपस्थित होऊ शकला नाही, किंबहुना प्रशासनानेदेखील यासंदर्भात अवाक्षरही उच्चारला नाही. महापालिकेने विकसित केलेल्या प्लॉटबाबत रविवारी महंत ग्यानदास यांनी साधुग्रामची पाहणी करून तीव्र नापसंती व्यक्त केली होती. एक समान विकसित प्लॉट काही उपयोगाचे नसल्याचे सांगून त्यांनी फेर प्लॉट विकसित करण्याची मागणी केली व प्रशासनानेही ते मान्य केले होते. त्यामुळे प्लॉटची फेररचना करण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)