शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

उद्यापासून मऱ्हळला यात्रोत्सव

By admin | Updated: February 10, 2017 00:04 IST

शनिवारपासून प्रारंभ : चार दिवसीय यात्रेत लाखो भाविक लावणार हजेरी

 निऱ्हाळे : प्रतिजेजुरी म्हणून लौकिकास पावलेल्या मऱ्हळ येथील खंडेराव महाराजांच्या चार दिवसीय यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शनिवारपासून (दि. ११) प्रारंभ होणाऱ्या यात्रोत्सवात सुमारे लाखभर भाविक ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’चा जयघोष व खोबरे-भंडाऱ्याची उधळण करीत दर्शनासाठी हजेरी लावतात.प्रतिजेजुरी म्हणून ओळख असलेल्या खंडोबा महाराज यात्रेसाठी राज्यभरातील भाविक मिळेल त्या वाहनाने दाखल होत आहेत. जेजुरीस जाण्यापूर्वी मंदिरात नारळ व बेल भंडारा अर्पण करण्याची प्रथा आहे. परिसरातील जागृत देवस्थान म्हणून येथे महत्त्व प्राप्त झालेले आहे. यात्रा समिती व ग्रामस्थांनी यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. देवराम महाराज हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मंदिर परिसर स्वच्छ केला आहे. विद्युत रोषणाई व पताकांनी मंदिर परिसर सजविण्यात आला आहे. शनिवारी रात्री पांगरी येथील मानाचा रथ मंदिरासमोर आल्यानंतर खंडेराव महाराज पालखी व देवाच्या मुखवट्याची विधिवत पूजा करण्यात येते. सामुदायिक आरती झाल्यानंतर रथाची गावातून वाजत-गाजत मिरणूक काढण्यात येते. ‘जय मल्हार’च्या जयघोषात आणि खोबरे-भंडाऱ्याच्या उधळणीत परिसर न्हाऊन निघतो. हातात दिवटी-बुधली घेऊन पुढे चालणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीत रथ व खंडेराव महाराजांची पालखी निऱ्हाळे रस्त्यावरील महाल बागेत नेण्यात येते. याप्रसंगी निऱ्हाळे, कणकोरी, माळवाडी, सुरेगाव, खंबाळे, पांगरी, वावी, निमोण, नांदूरशिंगोटे, दोडी, सायखेडा, घोटेवाडी, सिन्नर, नाशिक, अहमदनगर येथील भाविक आपापले देव महाल बागेत भेटीसाठी आणतात. रात्री १२ वाजेपासून पहाटे ६ वाजेपर्यंत नामवंत वाघे-मुरळीचा जागरणाचा कार्यक्रम संपन्न होतो. यावेळी अनंतयोग देव्हाऱ्याचे विधिवत पूजन करण्यात येते. रविवारी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत विविध धार्मिक पार पडणार आहेत. त्यानंतर दिवसभर नवसपूर्तीचे कार्यक्रम होतात. त्यानंतर मनोरंजनासाठी तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे यांच्या लोकनाट्य तमाशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी महाल बागेत तमाशा कलावंतांच्या हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दिवसभर भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. दुपारी ३ वाजता होणाऱ्या कुस्त्यांच्या दंगलीत राज्यभरातील नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत. यात्राकाळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वावी पोलीसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सिन्नर आगाराची ‘सिन्नर-निऱ्हाळे’ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय यात्राकाळात पांगरी ते मऱ्हळ अशा बसफेऱ्या दिवसभर सुरु राहणार आहेत. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सरपंच भाऊसाहेब बोडके, उपसरपंच संगीता बर्डे, पोलीस पाटील संदीप कुटे, रमेश कुटे, वसंत कुटे, बबन कुटे, भगीरथ लांडगे, दत्तू सांगळे, जयराम सांगळे, चंद्रकांत कुटे, सुदाम कुटे, रंगनाथ सगर, बाळू कुटे, शरद लांडगे, सुदाम सगर यांच्यासह जय मल्हार मित्रमंडळ व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)