शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

महालक्ष्मी, रेणुका माता मंदिरांची रंगरंगोटी

By admin | Updated: September 26, 2016 01:47 IST

माळावरची देवी : देवी मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची तयारी सुरू

देवळाली कॅम्प : रेस्ट कॅम्प रोडवरील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका माता मंदिर, लॅमरोड येथे जागृत देवस्थान माळावरची देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी माता मंदिरासह सर्वत्र नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.देवळाली कॅम्प-भगूर रेस्ट कॅम्प रोडवर पुरातन काळात भृगू ऋषींनी श्री रेणुका माता देवीच्या मूर्तीची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. मंदिरासमोर असलेले पाण्याचे बारव हे त्वचारोगापासून मुक्ती देणारे म्हणून ओळखले जाते. श्री रेणुका माता मंदिर हे नाशिक, इगतपुरी, सिन्नर या तालुक्यांसह विविध ठिकाणच्या भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्रीमध्ये या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची हजारोंच्या संख्येने दररोज गर्दी होत असते. तसेच नवरात्रीनिमित्त परिसरात मोठी जत्रादेखील भरली जाते. नवरात्रीनिमित्त मंदिराची स्वच्छता करून मंडप उभारण्यात आला आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने दर्शनरांगेची सोय करत १९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. गेल्या १५ वर्षांपासून नवरात्रीनिमित्त श्री रेणुका माता मूर्तीचे रंगकाम दिनेश करंजकर करत आहे. नवरात्रीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे मंदिराचे पुजारी देवीदास चिंगरे यांनी सांगितले. (वार्ताहर)कालिका मातेचा देखावालॅमरोड सहा नंबर नाक्यासमोर जागृत देवस्थान माळावरची देवी म्हणून श्री महालक्ष्मी माता मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येतात. नवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात मूर्ती उभारून मूर्तीची रंगरंगोटी करण्यात येत आहे. गुरुद्वारा रोडवरील महालक्ष्मी मंदिर, रविवार बाजार भागातील श्री मरीमाता मंदिर, शितळामाता मंदिर आदि मंदिरात नवरात्रीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. तर लॅमरोड युवक मित्रमंडळाने ५२ शक्तिपीठांपैकी सातवे शक्तिपीठ म्हणून ओळख असणाऱ्या गुजरात राज्यातील पावागड येथील कालिका मातेच्या मूर्तीचा देखावा साकारला आहे.