नाशिक : कल्याणी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित डान्सिंग डॉल स्पर्धेत शहरासह जिल्ातील विविध महिला कलाकारांनी सहभाग नोंदविला. महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गोरक्षानंद काका महाराज, योगीराज महाराज, रॉनी लथ, अभिनेत्री सुप्रिया पाटील, गौरी कुलकर्णी, प्रज्ञा राणे, स्नेहल राणे, अनुया मिसाळ आदि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सुप्रिया हिने बहारदार लावणी सादर करत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेत सहभागी कलाकारांच्या १४ संघांनी विविध हिंदी-मराठी गीतांवर नृत्य सादर केले. तसेच लावणी नृत्यांनी उपस्थित श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळविली. स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला स्मृतिचिन्हासह अकरा हजार रुपये, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या संघाला साडेपाच हजार रुपये व तृतीय क्रमांकाच्या संघाला दोन हजार शंभर रुपयांचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. संस्थेच्या अध्यक्ष सुनीता मोडक यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. शरद उगले, मिथिला भसे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. नेत्रा महाजन, स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
...ती जादू नव्या गीतांमध्ये नाही!
By admin | Updated: June 3, 2014 02:20 IST