शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या पदाधिकार्‍यांना धडकी ऑडिट : राज यांच्या निर्णयाकडे लक्ष

By admin | Updated: May 12, 2014 17:04 IST

नाशिक : राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात अचानक भेट देऊन नगरसेवकांकडून लोकसभा निवडणूक आणि पालिकेच्या कामकाजाविषयी थेट माहिती मिळविल्याने आता पदाधिकार्‍यांना धडकी भरली आहे. शुक्रवारी होणार्‍या मतमोजणीनंतर राज ठाकरे याबाबत निर्णय घेणार असून, कोणावर गंडांतर येणार याची चर्चा मनसेत सुरू झाली आहे.

नाशिक : राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात अचानक भेट देऊन नगरसेवकांकडून लोकसभा निवडणूक आणि पालिकेच्या कामकाजाविषयी थेट माहिती मिळविल्याने आता पदाधिकार्‍यांना धडकी भरली आहे. शुक्रवारी होणार्‍या मतमोजणीनंतर राज ठाकरे याबाबत निर्णय घेणार असून, कोणावर गंडांतर येणार याची चर्चा मनसेत सुरू झाली आहे.राज ठाकरे यांनी नाशिकला महत्त्व दिले आणि त्यामुळेच शहरातील तीन आमदारांबरोबरच पालिकेची सत्ता मनसेला मिळाली. परंतु दोन वर्षांत अपेक्षित कामगिरी होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आणि खुद्द ठाकरे यांचेही तसेच मत बनल्याने लोकसभा निवडणुकीच्या आधी नाशिकमध्ये येऊन त्यांनी झाडाझडती घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते कार्यप्रवण करण्याचा राज यांचा प्रयत्न असला, तरी लोकसभा निवडणुकीत मात्र मोठ्या प्रमाणात विसंगती आणि अनसमन्वय असल्याची मनसेतच चर्चा आहे. महत्त्वाचे म्हणजे, निवडणुकीत फाटाफूट झाल्याचीदेखील चर्चा आहे. लोकसभा निवडणूक आटोपली; परंतु विधानसभेच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून राज यांनी शनिवारी नगरसेवकांची व्यक्तिगत भेट घेऊन त्यांना मन मोकळे करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत काय घडले, त्याचबरोबर पदाधिकारी, आमदार, महापौर आणि पालिकेतील पदाधिकार्‍यांविषयीदेखील माहिती घेतल्याने ही खांदेपालटाची सुरुवात असल्याचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार योग्य होता; परंतु प्रचार संघटनेची योग्य यंत्रणा निवडणुकीत वापरली गेली नाही. कार्यकर्ते आणि उमेदवार यांच्यात समन्वय घालण्याची गरज असताना नेमके तेच केले गेले नाही. काहींनी तर पदाधिकार्‍यांच्या घराच्या आसपास असलेल्या मतदान केंद्रांवर पक्षाचे बूथ नव्हते, अशा थेट तक्रारी केल्या आहेत. त्यामुळेच राज आता काय निर्णय घेणार याविषयी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. विशेषत: राज यांच्या दृष्टीने लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. परंतु त्याचबरोबर विधानसभा निवडणूकही महत्त्वाची आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे मतमोजणीचे निकाल आल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून कडक निर्णय घेतले जाण्याची शक्यता असल्याने संघटना आणि सत्तेतील पदाधिकारी हवालदिल झाले आहेत. डॉ. पवार यांच्यावर मोठी जबाबदारीलोकसभा निवडणुकीचा आढावा घेताना बहुसंख्य नगरसेवकांनी डॉ. प्रदीप पवार यांच्याविषयी अनुकूल मत व्यक्त केल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे शहराध्यक्ष समीर शेटे यांना प्रकृतीच्या कारणावरून अन्य जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.