शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

मनसेच्या पदाधिकार्‍यांना धडकी ऑडिट : राज यांच्या निर्णयाकडे लक्ष

By admin | Updated: May 12, 2014 21:59 IST

नाशिक : राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात अचानक भेट देऊन नगरसेवकांकडून लोकसभा निवडणूक आणि पालिकेच्या कामकाजाविषयी थेट माहिती मिळविल्याने आता पदाधिकार्‍यांना धडकी भरली आहे. शुक्रवारी होणार्‍या मतमोजणीनंतर राज ठाकरे याबाबत निर्णय घेणार असून, कोणावर गंडांतर येणार याची चर्चा मनसेत सुरू झाली आहे.

नाशिक : राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात अचानक भेट देऊन नगरसेवकांकडून लोकसभा निवडणूक आणि पालिकेच्या कामकाजाविषयी थेट माहिती मिळविल्याने आता पदाधिकार्‍यांना धडकी भरली आहे. शुक्रवारी होणार्‍या मतमोजणीनंतर राज ठाकरे याबाबत निर्णय घेणार असून, कोणावर गंडांतर येणार याची चर्चा मनसेत सुरू झाली आहे.राज ठाकरे यांनी नाशिकला महत्त्व दिले आणि त्यामुळेच शहरातील तीन आमदारांबरोबरच पालिकेची सत्ता मनसेला मिळाली. परंतु दोन वर्षांत अपेक्षित कामगिरी होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आणि खुद्द ठाकरे यांचेही तसेच मत बनल्याने लोकसभा निवडणुकीच्या आधी नाशिकमध्ये येऊन त्यांनी झाडाझडती घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते कार्यप्रवण करण्याचा राज यांचा प्रयत्न असला, तरी लोकसभा निवडणुकीत मात्र मोठ्या प्रमाणात विसंगती आणि अनसमन्वय असल्याची मनसेतच चर्चा आहे. महत्त्वाचे म्हणजे, निवडणुकीत फाटाफूट झाल्याचीदेखील चर्चा आहे. लोकसभा निवडणूक आटोपली; परंतु विधानसभेच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून राज यांनी शनिवारी नगरसेवकांची व्यक्तिगत भेट घेऊन त्यांना मन मोकळे करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत काय घडले, त्याचबरोबर पदाधिकारी, आमदार, महापौर आणि पालिकेतील पदाधिकार्‍यांविषयीदेखील माहिती घेतल्याने ही खांदेपालटाची सुरुवात असल्याचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार योग्य होता; परंतु प्रचार संघटनेची योग्य यंत्रणा निवडणुकीत वापरली गेली नाही. कार्यकर्ते आणि उमेदवार यांच्यात समन्वय घालण्याची गरज असताना नेमके तेच केले गेले नाही. काहींनी तर पदाधिकार्‍यांच्या घराच्या आसपास असलेल्या मतदान केंद्रांवर पक्षाचे बूथ नव्हते, अशा थेट तक्रारी केल्या आहेत. त्यामुळेच राज आता काय निर्णय घेणार याविषयी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. विशेषत: राज यांच्या दृष्टीने लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. परंतु त्याचबरोबर विधानसभा निवडणूकही महत्त्वाची आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे मतमोजणीचे निकाल आल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून कडक निर्णय घेतले जाण्याची शक्यता असल्याने संघटना आणि सत्तेतील पदाधिकारी हवालदिल झाले आहेत...इन्फो..डॉ. पवार यांच्यावर मोठी जबाबदारीलोकसभा निवडणुकीचा आढावा घेताना बहुसंख्य नगरसेवकांनी डॉ. प्रदीप पवार यांच्याविषयी अनुकूल मत व्यक्त केल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे शहराध्यक्ष समीर शेटे यांना प्रकृतीच्या कारणावरून अन्य जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.