शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मका बियाणे घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:48 IST

सटाणा/ताहाराबाद : मका प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत महाबीजकडून शेतकºयांना मोफत वितरित होणारे प्रत्येकी दोन किलो मका बियाणे कृषी सहायकाने परस्पर एका व्यापाºयाला व काही शेतकºयांना दोनशे रुपये प्रतिकिलोने विकल्याचा प्रकार बागलाण तालुक्यातील पिंपळकोठेचे सरपंच किशोर भामरे यांनी गुरुवारी (दि. २८) उघडकीस आणल्याने कृषी विभागासह शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे. या मका घोटाळ्यात वरिष्ठ अधिकारीही सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देकृषी सहायकाचा प्रताप : मोफत बियाणांची परस्पर विक्री

सटाणा/ताहाराबाद : मका प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत महाबीजकडून शेतकºयांना मोफत वितरित होणारे प्रत्येकी दोन किलो मका बियाणे कृषी सहायकाने परस्पर एका व्यापाºयाला व काही शेतकºयांना दोनशे रुपये प्रतिकिलोने विकल्याचा प्रकार बागलाण तालुक्यातील पिंपळकोठेचे सरपंच किशोर भामरे यांनी गुरुवारी (दि. २८) उघडकीस आणल्याने कृषी विभागासह शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे. या मका घोटाळ्यात वरिष्ठ अधिकारीही सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.धक्कादायक बाब म्हणजे हे प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच संबंधित कृषी सहायकाने प्रकरण दडपण्यासाठी थेट पिंपळकोठे येथे धाव घेत सरपंच किशोर भामरे यांच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला; मात्र भामरे यांनी शेतकºयांची बाजू लावून धरत हे मका बियाणे घोटाळा प्रकरण थेट प्रसार-माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावून घेत कृषी सहायक के.आर. पिठे यांचा भांडाफोड केला.राज्य शासनाकडून कृषी विभागाच्या माध्यमातून मका प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत शेतकºयांना महाबीजकडून प्रत्येकी दोन किलो मका बियाणे वितरित केले जात आहे.बागलाण तालुक्यातील पिंपळकोठेचे सरपंच किशोर भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार गावाला याच योजनेतून दोन क्विंटल मका बियाणे शेतकºयांना मोफत वितरित करण्यासाठी पाठविले आले होते; मात्र कृषी सहायक के. आर. पिठे यांनी सदर बियाणे शेतकºयांनामोफत न वाटता पिंपळकोठे येथील काही शेतकरी व बियाणे विके्रत्याशी परस्पर व्यवहार करून दोनशे रुपये प्रतिकिलोप्रमाणे मका बियाणाची विक्र ी करून शासनासह शेतकºयांची मोठी फसवणूक केल्याचा आरोप किशोर भामरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. यामुळे बागलाण तालुक्यात खळबळ उडाली आहे.जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करणारकृषी सहायक पिठे यांचा मका बियाणे घोटाळा सरपंच किशोर भामरे यांनी उघडकीस आणताच घोटाळेबाज कृषी सहायकाने पिंपळकोठे गाठत सरपंच भामरे यांना आमीष दाखविण्याचा प्रयत्न केला; मात्र भामरे यांनी आमिषाला बळी न पडता हा मका बियाणे घोटाळा समोर आणला. हा घोटाळा नुसता पिंपळकोठेपुरता मर्यादित नसून याची व्याप्ती तालुकाभर असण्याची शक्यता सरपंच भामरे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या घोटाळ्याची तक्र ार करणार असल्याचे भामरे यांनी म्हटले आहे.