शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

मुकणे प्रश्नी सेनेची उडी; विशेष महासभेची मागणी

By admin | Updated: September 23, 2015 00:20 IST

बोलविता धनी वेगळाच : महानगरप्रमुखांचा आरोप

नाशिक : मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेसंबंधी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय घेण्याचा अल्टीमेटम न्यूनतम निविदाधारक एल अ‍ॅण्ड टी कंपनीने महापालिकेला दिल्यानंतर शिवसेनेनेही या प्रश्नी उडी घेत आपली विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे. सदर कंपनीच्या पत्रामागे बोलविता धनी वेगळाच असून कंपनीच्या दबावाला बळी न पडता या प्रश्नी विशेष महासभा घेऊन सखोल चर्चा घडविण्याची मागणी महानगरप्रमुख व सेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे.मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने उठविल्यानंतर याबाबत येत्या ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा सदर प्रकल्प साकारणे परवडणार नसल्याचे पत्र एल अ‍ॅण्ड टी कंपनीने महापालिका आयुक्तांना दिले आहे. त्याबाबत शिवसेनेची भूमिका मांडताना अजय बोरस्ते यांनी सांगितले, कंपनीचे असे पत्र येणे आणि प्रशासनाने त्याबाबत तत्परता दाखविणे यापाठीमागे नेमका कोण नेम साधतो आहे, याची चौकशी झाली पाहिजे. मुकणे प्रश्नी महापालिकेवर अतिरिक्त बोजा पडू नये, ही सेनेची प्रारंभापासूनची भूमिका आहे. निविदा प्रक्रियेनंतर अटी-शर्तींमध्ये झालेले बदल, जलशुद्धिकरण प्रकल्पाची कमी करण्यात आलेली क्षमता, पाईपच्या आकारमानातील बदल या साऱ्या बाबी संशयास्पद आहेत. त्याचा खुलासा होणे आवश्यक आहे. शासनानेही स्थगिती उठविताना महापालिकेवर कोणतीही आर्थिक तोशीस लागू नये, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सदर प्रस्तावावर विशेष महासभा बोलावून सखोल चर्चा घडणे अत्यावश्यक आहे. शिवसेना त्याबाबत महासभेत जाब विचारणार आहे. सत्ताधाऱ्यांनीही कुणाला पाठीशी घालू नये, असा इशाराही बोरस्ते यांनी दिला.