शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आवळबारीच्या पायथ्याशी प्रेमीयुगुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 17:58 IST

बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील सावरगाव पठावेदिगर पैकी या आदिवासी गावालगत आवळ बारीच्या पायथ्याशी एका प्रेमी युगुलाने झाडावर गळफास घेऊन आत्महत्त्या केली. रविवारी सकाळी सदर प्रकार उघडकीस आला.

पंडित गणपत टोपले यांच्या शेत गट क्र. ६२ मधील आंब्याच्या झाडावर दोन मृतदेह लटकलेल्या अवस्थेत घटनास्थळालगत राहणाऱ्या वसंत काशीराम टोपले यांना रविवारी सकाळी निदर्शनास आले. त्यांनी पठावे दिगर येथील पोलीस पाटील दयाराम पवार यांना कळविल्यानंतर सटाणा पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. पंचनामा करीत असताना पोलिसांना घटनास्थळाजवळ मोटारसायकल, ब्लँकेट, साडी तसेच आंब्याच्या झाडाला लटकलेले मृतदेह आढळून आले. तपासाअंती मयत बाळू मधुकर टोपले (३०, रा. पठावे दिगर) व आशाबाई पोपट चौरे (२५, रा. तुंगेल) असल्याचे निदर्शनास आले. ते दोघेही विवाहित त्यांना प्रत्येकी दोन अपत्ये आहेत. दोघेही मयत त्यांच्या कुटुंबासमवेत एक वर्षापासून सोग्रस फाटालगत नैताळे रोडवरील एका पोल्ट्री फार्मवर मजूरी करीत होते. त्याच दरम्यान त्यांचे प्रेमसंबंध जुळून आले होते. आशा ही महिन्यापूर्वी पोल्ट्रीचे कामकाज सोडून गावाकडे घर बांधण्यासाठी कुटुंबासमवेत परतली होती, तर बाळू हा आजीच्या निधनानिमित्त चार दिवसांपासून पठावे दिगर येथे आलेला होता.तीन ते चार दिवसांपासून आशा बेपत्ता झाल्याने कुटुंबीय नातेवाईकांकडे तिचा शोध घेत होते. दरम्यान रविवारी पठावे दिगर येथे प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची वार्ता परिसरात पसरली. चौकशीसाठी तुंगेल येथील आशाचे नातेवाईक पठावे दिगर येथे गेले असता तिची ओळख पटली. दोघांचे मृतदेह श्वविच्छेदनासाठी ग्रामीण रु ग्णालय डांगसौंदाणे येथे पाठविण्यात आले असून पुढील तपास सटाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व देवेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या