शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीत महिलांचा उदंड उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:50 IST

लोकशाहीचा उत्सव त्यात प्रथमच मतदान करण्याची संधी यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तरुणाईचा उदंड उत्साह अनुभवाला आला

नाशिक : लोकशाहीचा उत्सव त्यात प्रथमच मतदान करण्याची संधी यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तरुणाईचा उदंड उत्साह अनुभवाला आला आणि मतदान केल्यानंतर तो त्यांच्या चेहेऱ्यावर झळकला. दुसरीकडे निर्णायक ठरू शकणाºया स्त्री शक्तीनेदेखील उन्हाची तमा न बाळगता मतदान केंद्रांवर रांगा लागून मतदान केले. नाशिकचा टक्का वाढण्याचे श्रेय त्यांना दिले जात आहे.नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२९) मोठ्या उत्साहात मतदान झाले. यात सर्वाधिक चर्चेत होती ती तरुणाई आणि महिलांचे मतदान.लोकसभा निवडणुकीत यंदा फर्स्ट टाइम व्होटर तरुणाई आणि महिला या दोन घटकांचे मतदान सर्वांत महत्त्वाचे होते. नवी पिढी ही सर्वच बाबतीत अत्यंत सजग असल्याने त्यांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनीदेखील प्रयत्न केले. यंदा नाशिक लोकसभा मतदारसंघात आठ लाख ९३ हजार ७७ महिला मतदार होत्या. एकूण मतदार संख्येच्या सुमारे चाळीस ते पंचेचाळीस टक्के मतदान असल्याने ही स्त्री शक्तीदेखील महत्त्वाची मानली जाते त्यामुळे यंंदा हे मतदान महत्त्वाचे होते.सोमवारी सकाळपासूनच शहरातील विविध केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदानाला लवकर संधी मिळावी यासाठी सकाळपासून रांगा असल्या तरी त्यात तरुणाईचा उत्साह प्रचंड होतात. अनेक युवक-युवती कुटुंबाखेरीज एकत्रित मतदानासाठी आले होते आणि त्यानंतर मतदानानंतर त्यांनी सेल्फीदेखील काढले. केवळ युवक-युवतीच नव्हे तर अनेक ठिकाणी महिलांच्या एकत्रित ग्रुपने एकत्रित मतदान करण्याबरोबरच भेटीचा आनंद लुटला. सर्व सख्या त्यासाठी खास एकत्र आल्या होत्या. शहरातील जुन्या नाशिक भागातदेखील अल्पसंख्याक समाजाच्या महिला सकाळीच बाहेर पडल्या होत्या. सायंकाळीही महिलांची मोठी गर्दी होती.महिलांसाठी स्वतंत्र रांगा नाही तरीही...निवडणूक आयोगाने यंदा महिलांसाठी स्वतंत्र रांगा करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र महिलांच्या सखी केंद्राशिवाय अशी व्यवस्था नव्हती. मात्र तरीही महिलांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. दुपारनंतर बहुसंख्य मतदानकेंद्रांवर महिलांची मतदानासाठी रांग दिसून आली. महिलांमधील मतदानाचा हा उत्साह सायंकाळपर्यंत कायम होता. बी.डी. भालेकर केंद्रावर उशिरांपर्यंत महिलांची गर्दी होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक