शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दागिन्यांसह हरविलेली बॅग माहेरवाशिणीच्या पुन्हा पदरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:17 IST

सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील नवीन मध्यवर्ती बसस्थानकात सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मनीषा प्रकाश मेहता या बसमधून मुंबईतून दाखल झाल्या. ...

सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील नवीन मध्यवर्ती बसस्थानकात सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मनीषा प्रकाश मेहता या बसमधून मुंबईतून दाखल झाल्या. येथून त्यांनी कस्तुरबानगर येथे माहेरी जाण्यासाठी रिक्षा केली. दागिने, रोकड ज्या बॅगेत त्यांनी ठेवलेली होती, ती बॅग अनावधानाने मेहता या रिक्षातच विसरल्या. घरी आल्यानंतर जेव्हा त्यांनी सर्व बॅग तपासल्या तेव्हा त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे त्या प्रचंड घाबरल्या आणि आता दागिने हरविल्याने सासरी काय सांगायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिल्याने त्या तणावाखाली आल्या. काही वेळेतच आपल्या नातेवाइकांसह त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घडलेला प्रकार कथन केला. तत्परतेने गुन्हे शोध पथकाने त्र्यंबकनाका गाठले. तेथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत रिक्षा मेहता यांनी ओळखली. या रिक्षाची माहिती घेतली असता रिक्षा नाशिक रोड भागातील असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी नाशिक रोड गाठले. तेथे तपास करत रिक्षाचा शाेध घेतला असता, रिक्षामध्ये पाठीमागील बाजूस बॅग सुरक्षित असल्याचे पोलिसांना आढळून आले. बॅग उघडून दागिने, रोकड सुरक्षित असल्याची पोलिसांनी खात्री पटविली. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रारदार मेहता यांना ही बॅग परत करण्यात आली. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे माहेरवाशीण महिलेला तिचे हरविलेले दागिने, रोकड पुन्हा मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावर झळकत होता.