शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात विविध ठिकाणी  पाच बसेसचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:14 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने दुपारी मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्रा चौक येथे रास्ता रोको आंदोलन सुरू असताना शहरात विविध ठिकाणी पाच बसेस फोडण्यात आल्या. सुरक्षिततेच्या कारणास्तव सायंकाळी काही मार्गांवरील बसेस बंद करण्यात आल्या होत्या.

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने दुपारी मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्रा चौक येथे रास्ता रोको आंदोलन सुरू असताना शहरात विविध ठिकाणी पाच बसेस फोडण्यात आल्या. सुरक्षिततेच्या कारणास्तव सायंकाळी काही मार्गांवरील बसेस बंद करण्यात आल्या होत्या.  राज्यात मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यामुळे ठिकठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला लक्ष्य करण्यात आले आहे. नाशिकमध्येही मंगळवारी पाच ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आली. जत्रा चौकात दुपारी आंदोलन सुरू झाल्यानंतर शालिमार चौकात पहिली बस फोडण्यात आली. त्यानंतर काही वेळातच महात्मानगर, त्यानंतर सातपूर पोलीस ठाणे आणि नंतर चेहेडी येथे बसेसवर दगडफेक करण्यात आली. रात्री ८ वाजेच्या सुमारास रविवार कारंजा येथे टोळ्क्यांनी शहर बसवर दगडफेक केली.शाळांना सुटी नाही !नाशिक : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (दि. २५) नाशिक शहरासह जिल्हाबंदचे आवाहन करण्यात आले असले तरी शाळांना मात्र अधिकृतपणे सुटी नसल्याचे शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी सांगितले.  मंगळवारी मराठा समाजाच्या संघटनांच्या वतीने महाराष्टÑ बंद असल्याचे अगोदरच जाहीर झाल्याने शहरातील बहुतांशी शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. अनेक शाळांमध्ये पालकांवर निर्णय सोपविण्यात आला होता. त्यानंतर आता बुधवारी (दि. २५) नाशिक बंदची हाक देण्यात आली असून, त्या पार्श्वभूमीवर शाळा मात्र अधिकृतरीत्या बंद राहणार नसल्याचे शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी कळविले आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा