शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठालगत विक्रेत्यांची तारांबळ

By admin | Updated: August 1, 2016 01:11 IST

व्यवसाय ठप्प : नदीपात्रात पोहण्याचा लुटला आनंद

नाशिक : गोदावरी नदीपात्रात दोन टप्प्यांत धरणातून करण्यात आलेल्या अडीच हजार क्यूसेक पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरीला पूर आला होता. वीस दिवसांपूर्वी आलेल्या पुराच्या तुलनेत रविवारी (दि.३१) नदीपात्राच्या पाण्याची पातळी कमीच राहिल्याने कु ठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.पावणे दहा वाजेच्या सुमारास अग्निशामक दलाचा पंचवटी केंद्राचा रेस्क्यू बंब घटनास्थळी रबर बोटीसह दाखल झाला. दरम्यान, तातडीने जवानांनी ध्वनिक्षेपकांवरून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत गोदाकाठापासून सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना देण्यास सुरुवात केली. देवमामलेदार मंदिराजवळील नागरिक, नीळकंठेश्वर मंदिर ते भांडीबाजारापर्यंतची दुकाने विक्रेत्यांनी तत्काळ बंद केली. तसेच भाजीबाजारामधील विक्रेत्यांनीदेखील पटांगण सोडून नारोशंकर मंदिराच्या रस्त्यालगत आश्रय घेतला. धरणातून आलेल्या पाण्यामुळे नदीकाठालगत विक्रेत्यांची तारांबळ उडाली. नदीवरील लहान पूल पाण्याखाली गेले होते. रोकडोबा मैदानापर्यंत पुराचे पाणी आले होते. नदीपात्रात दोन टप्प्यांमध्ये सोडण्यात आलेल्या पाण्याने लहान मंदिरे पाण्याखाली गेली होती. दुपारी दोन वाजेनंतर नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये अधिक वाढ झाल्याचे दिसून आले. जलसंपदा व पूर नियंत्रण विभागाने दिलेल्या माहितीनुसार अडीच वाजेपासून अहल्यादेवी होळकर पुलाखालून नदीपात्रात सुमारे अडीच हजार क्यूसेक पाणी प्रवाहित होत होते. वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नदीपात्रात दुपारी अडीच वाजेपर्यंत साडेतीन हजार क्यूसेक पाणी पोहचले होते. त्यामुळे दोन वर्षांत प्रथमच नदी दुथडी भरून वाहिली. (प्रतिनिधी)