शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तोतया पोलिसांनी होमगार्डला फसविले

By admin | Updated: September 13, 2016 01:26 IST

नाशिकरोड येथील घटना : मोटारसायकल घेऊन केले पलायन

नाशिकरोड : आगरटाकळी येथे गणेशोत्सवाच्या बंदोबस्तावर असलेल्या होमगार्डलाच दोघा भामट्या तोतया पोलिसांनी आम्ही पोलीस आहोत असे सांगून नाशिकरोड रेल्वेस्थानकावर तपासणीसाठी घेऊन जात होमगार्डची मोटारसायकल पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेशोत्सव बंदोबस्तासाठी आगरटाकळी दिवे बंगला चौफुलीवर होमगार्ड कैलास देवराम दराणे व सारिका घोडेकर यांना रविवारी सायंकाळी नेमले होते. रात्री ८.३० च्या सुमारास दोघे इसम त्यांच्याजवळ आले व त्यांनी दराणे याला आम्ही उपनगर पोलीस ठाण्यात डीबीमध्ये आहोत आताच नांदेड येथून बदली होऊन आलो आहोत. तू आम्हाला ओळखत नाही, असे सांगितले. त्या दोघांनी दराणे याला तुझी मोटारसायकल घे पेट्रोलिंग करत नाशिकरोड रेल्वेस्थानकावर तपासणी करून येऊ असे सांगितले. दराणेची मोटारसायकल एकजण चालविण्यास बसला. आगरटाकळी येथून रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी निघाल्यानंतर त्यांनी टाकळीरोडच्या तपोवन रस्ता कॉर्नरवर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांजवळ गाडी थांबवून नमस्कार करत काही काळ त्यांच्याशी बोलले. त्यानंतर रस्त्यात समोरून येणारी पोलीस मोबाइल व्हॅनला हात देत आपण दोघे पोलीसच आहोत असे दराणे याला दाखवत रेल्वेस्थानकावर नेले. रेल्वेस्थानकात झोपलेल्या व बसलेल्या प्रवाशांना त्या दोघा भामट्यांनी दराणे याला सोबत ठेवत प्लॅटफॉर्म, रेल्वे तिकीट आहे का अशी विचारणा करत धमकावण्यास व पैसे मागण्यास सुरुवात केली. यावेळी त्या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याने त्या दोघांना तुम्ही कोण आहात, कुठून आलात अशी विचारणा करण्यास सुरुवात केली असता त्यांनी गर्दीचा फायदा घेत पलायन करून दराणे यांची मोटारसायकल पळवून नेली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तोतया पोलीस म्हणून वावरणारे राजेश भास्कर शार्दुल, बंडू सोळंखे रा. आगर टाकळी या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शार्दुल याला उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.