नाशिक : बँकेतून पैसे काढल्यानंतर पायी जात असलेल्या युवकास तिघा संशयितांनी अडवून रोकड लुटून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ १९) दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्र्यंबकरोडवर घडली़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सातपूरच्या पाइपलाइन रोड परिसरातील गणेशनगरमधील मंत्री अपार्टमेंटमधील फ्रॅण्डी संजय सिंह (१७) या युवकाने दुपारी दीड वाजेच्या सुमारास बँक आॅफ इंडियाच्या सातपूर शाखेतून आठ हजार रुपये काढले़ बँकेतून काढलेले पैसे घेऊन विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे जात असताना तिघा युवकांनी त्यास अडविले़ यानंतर धक्काबुक्की करून त्याच्या खिशातील आठ हजार रुपयांची रोकड या संशयितांनी काढून घेतली व फरार झाले़
त्र्यंबकरोडवर युवकाची लूट
By admin | Updated: May 19, 2017 17:01 IST