नाशिक : मनपाच्या कनिष्ठ अभियंत्यासोबत काम करीत असल्याचा राग मनात धरून दोघा संशयितांनी एकास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम लुटून नेल्याची घटना घडली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक महापालिकेचे कनिष्ठ अभियंता वाडिले यांच्यासोबत उपनगर येथील संजय दादा जाधव (४८) हे काम करतात़ याचा राग मनात धरून संशयित गणेश कांबळे, रवि वाघमारे व त्यांचे दोन साथीदार यांनी शुक्रवारी (दि़३०) रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास जाधव यांना चाकूचा धाक दाखवून राजदूत हॉटेलच्या बाजूला नेऊन शिवीगाळ केली़ तसेच त्यांच्या खिशातील ४ हजार ३०० रुपये काढून घेत पुन्हा वाडिले यांच्यासोबत काम केल्यास बघून घेऊ, अशी धमकी दिली़ या प्रकरणी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित कांबळे, वाघमारे व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
चाकूचा धाक दाखवून एकाची लूट
By admin | Updated: November 1, 2015 22:15 IST