शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात लोणचे बनविण्यासाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 16:11 IST

चिनीमातीच्या बरण्यांना मागणी : कैरीचा भाव २५० रुपये शेकडा

ठळक मुद्देमान्सूनपूर्व पावसाने परिसरात रिमझिम हजेरी लावल्याने लोणच्यासाठी लागणा-या कै-या घेण्यास नागरिकांनी सुरूवात केली आहे.

खमताणे : साधारणपणे जून महिन्यात पहिला पाऊस पडला की ग्रामीण भागात घरोघरी लोणच्याचा सुवास दरवळयाला लागतो. अद्याप अपेक्षित पाऊस पडला नसला तरी घराघरांत गृहिणींची मात्र लोणचे तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. लोणच्यासाठी बाजारात कैऱ्या दाखल होत असून २५० ते ३५० रुपये शेकडा दराने विक्री होत आहे तर लोणचे साठविण्यासाठी चिनी मातीच्या बरण्यांनाही मागणी वाढली आहे.लोणच्यासाठी लागणारी कैरी घेण्यासाठी बाजारपेठेत सध्या महिलांची गर्दी दिसू लागली आहे. मान्सूनपूर्व पावसाने परिसरात रिमझिम हजेरी लावल्याने लोणच्यासाठी लागणा-या कै-या घेण्यास नागरिकांनी सुरूवात केली आहे. यंदा कैऱ्यांची आवक कमी प्रमाणात आहे. साधारणपणे २५० ते ३५० रुपये शेकडा या भावाने कै-यांची विक्र  होत आहे. लोणच्यासाठी लागणारे मसाल्याचे पदार्थही यंदा महागले आहेत . अतिशय दळदार आणि बाहेरून काळपट हिरवी ; परंतु आतून पांढरी शुभ्र, अशा कैरीला बाजारात मोठी मागणी आहे. ग्रामीण भागासह गुजरात राज्यातील सौराष्टतील लोणच्याच्या कैरीला मोठी मागणी आहे. बाजारातून कैरी विकत घेऊन त्या घरी स्वच्छ पाण्यात टाकली जातात. मग ती कैरी दुस-या दिवशी सकाळी धुऊन व पुसुन फोडली जाते. चमचमीत मसाला टाकून लोणचे तयार केले जाते. . त्याचप्रमाणे हे लोणचे टाकण्यासाठी लागणा-या चिनी मातीच्या बरणीच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली. कैरी लोणच्यासोबतच लिंबु, आवळा, हिरवी मिरची आदींचेहे लोणचे टाकण्यात महिलांची लगबग सुरू आहे. पुर्वी मातीपासून तयार केलेल्या खा-यांमध्ये लोणचे भरले जायचे. मात्र, आता हळूहळू तो हद्दपार झाला आहे. स्थानिक व्यापा-यांनी हैदराबाद व गुजरात येथुन बरण्या मागविल्या आहेत. हे लोणचे दीर्घकाळ टिकते. ते बनविण्याचीही पूर्वापार एक पद्धत आहे. त्या पद्धतीताच अवलंब करून गृहिणी लोणचे बनविण्याचे काम करीत असतात.

टॅग्स :NashikनाशिकMangoआंबा