शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

विक्रीऐवजी दीर्घकालीन भाडेपट्टीचा स्वीकारला पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 14:16 IST

नाशिक : सुमारे तीनशे कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी नाशिक साखर कारखाना व निफाड साखर कारखाना विक्रीचा निर्णय घेणाºया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने आता कारखाने विक्रीला येत असलेल्या अडचणी पाहून, दीर्घकालीन करारावर हे दोन्ही कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात सोमवारी (दि.१६) एका राज्यस्तरीय व राष्ट्रीय वृत्तपत्रात जिल्हा बॅँकेने निविदा मागविल्या आहेत. ...

ठळक मुद्देनिसाका, नासाका विक्री प्रकरण : जिल्हा बॅँक

नाशिक : सुमारे तीनशे कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी नाशिक साखर कारखाना व निफाड साखर कारखाना विक्रीचा निर्णय घेणाºया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने आता कारखाने विक्रीला येत असलेल्या अडचणी पाहून, दीर्घकालीन करारावर हे दोन्ही कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात सोमवारी (दि.१६) एका राज्यस्तरीय व राष्ट्रीय वृत्तपत्रात जिल्हा बॅँकेने निविदा मागविल्या आहेत. त्यानुसार मंगळवार ((दि.१७ ) पासून ३ नोव्हेंबर दरम्यान दोन्ही कारखान्यांच्या विक्रीसाठी आणि भाडेतत्त्वावर देण्यासाठी या निविदा मागविण्यात आल्या आहेत. नाशिक सहकारी साखर कारखाना २५ वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्यासाठी संबंधितांकडून ४० टक्के रक्कम पहिल्या दहा वर्षांसाठी म्हणजेच ५४ कोटी ७८ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्यासाठी बयाणा रक्कमही ५ कोटी ४८ लाख ठेवण्यात आली आहे, तर निफाड सहकारी कारखाना २५ वर्षाच्या भाडे तत्त्वावर देण्यासाठी पहिल्या दहा वर्षांसाठी ५८ कोटी ९९ लाख रुपये व बयाणा रक्कम म्हणून ५ कोटी ९० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. येत्या ७ नोव्हेंबरला या भाडेकराराच्या निविदा उघडण्यात येणार आहेत. तर संपूर्ण विक्रीसाठी दिलेल्या निविदा ८ नोव्हेंबर रोजी उघडण्यात येणार आहेत. नाशिक सहकारी साखर कारखान्याकडे ३० सप्टेंबर २०१७ अखेर जिल्हा बॅँकेची एकूण थकबाकी १३६ कोटी ९६ लाख ३३ हजार असून, निफाड साखर कारखान्याकडे १६६ कोटी ३९ लाख ५९ हजार रुपये थकबाकी आहे.