शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

‘लोकमत’चे सहयोगी समूह संपादक हेमंत कुलकर्णी यांचे निधन

By admin | Updated: February 3, 2017 01:47 IST

‘लोकमत’चे सहयोगी समूह संपादक हेमंत कुलकर्णी यांचे निधन

नाशिक : अत्यंत परखड आणि तटस्थ; पण तितक्याच लालित्यपूर्ण शैलीत लेखन करत पत्रकारिता क्षेत्रात स्वत:चा मानदंड निर्माण करणारे ‘लोकमत’चे सहयोगी समूह संपादक हेमंत दत्तात्रेय कुलकर्णी यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. नाशिक येथील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि. ३) अंत्यसंस्कार होणार असून, सकाळी ९.३० वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी कालिंदी, दोन विवाहित मुली मुग्धा शहा व प्राजक्ता जडे, जावई, तीन भाऊ असा परिवार आहे. हेमंत कुलकर्णी यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने कॉलेजरोडवरील विजन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच गुरुवारी दुपारी २.५० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मूळचे अहमदनगर निवासी असलेल्या हेमंत कुलकर्णी यांचे शालेय शिक्षण नागपूर येथे दादा चौधरी विद्यालयात झाले. नागपूर विद्यापीठातूनच त्यांनी पत्रकारितेतील पदवी संपादन केली होती. पत्रकारितेची वाट चोखाळणाऱ्या कुलकर्णी यांनी थेट मुंबई गाठली आणि लोकसत्तामधून त्यांनी पत्रकारितेचा श्रीगणेशा केला. लोकसत्ताचे माजी संपादक कै. विद्याधर गोखले यांचे बोट धरत त्यांची वाटचाल सुरू झाली आणि एक विलक्षण अशी शैली आत्मसात करत कुलकर्णी यांनी पत्रकारितेत स्वतंत्र ठसा उमटविला. मुंबईनंतर कुलकर्णी यांनी १९८२-८३ पासून नाशिक येथे लोकसत्ताच्या जिल्हा प्रतिनिधीपदाची सूत्रे स्वीकारली. लोकसत्तामधील त्यांनी चालविलेले ‘वेध उत्तर महाराष्ट्राचा’ हे सदर विशेष लोकप्रिय ठरले होते. समाजातील विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवणाऱ्या कुलकर्णी यांचे ‘भाष्य’ स्तंभलेखनही गाजले. डिसेंबर २००३ मध्ये त्यांनी ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीच्या संपादकपदाची सूत्रे हाती घेतली होती. तेरा वर्षांपासून ‘लोकमत’मध्ये कार्यरत असलेल्या कुलकर्णी यांची गेल्याच वर्षी सहयोगी समूह संपादकपदी नियुक्ती झाली होती. पत्रकाराने समाजात वावरताना आणि प्रसंगी लोकांशी समरस होतानाही आपली तटस्थ भूमिका अबाधित ठेवली पाहिजे आणि कोणत्याही घटनेचे विश्लेषण त्रयस्थाच्या भूमिकेतून अत्यंत परखडपणे केले पाहिजे, अशी धारणा घेऊन पत्रकारिता करणाऱ्या कुलकर्णी यांचा लेखनसंग्रह ‘परखड’ या शीर्षकाखाली जून २००१ मध्ये प्रसिद्ध झाला होता. एक लिहिता संपादक म्हणून त्यांची ख्याती होती. ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकर, माधव गडकरी, अरुण टिकेकर या मान्यवर संपादकांचा त्यांना सहवास लाभला होता. साहित्य क्षेत्राबाबतही त्यांची विशेष रुची होती. पत्रकारितेतील त्यांच्या कर्तृत्वाचा अनेक संस्थांनी गौरव केला होता. कुलकर्णी यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. कुलकर्णी यांच्या निधनाचे वृत्त कळताच नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री विनायकदादा पाटील, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि पत्रकारितेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रुग्णालयात तसेच त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली आणि अंत्यदर्शन घेतले.